Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस नवी मालिका, उलगडणार प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला स्पर्श करणार गोष्ट

बाईपण जिंदाबाद या मालिकेच्या शृखंलेत येणार तिसरी कथा ‘आई रिटायर होतेय’.ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 07, 2025 | 01:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे त्यांच्या भावनिक मालिकेद्वारे – ‘बाईपण जिंदाबाद’.प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे त्याग, समर्पण आणि जबाबदाऱ्यांनी विणलेली कहाणी असते. लग्नाआधी वडिलांचं घर सांभाळणारी मुलगी, लग्नानंतर नवऱ्याचं घर आणि संसार आपल्या खांद्यावर वाहते. तिचं स्वतःचं आयुष्य, तिचे स्वप्न, तिच्या इच्छा या सगळ्या ती कुठेतरी मागे ठेवते. नात्यांच्या बंधनात अडकलेली, पण त्याच नात्यांना जिवापाड जपणारी ही स्त्री म्हणजे ‘आई’. अशीच एक स्त्री, अशीच एक आई, आता स्वतःचं आयुष्य नव्यानं जगण्याचा निर्णय घेते. बाईपण जिंदाबाद या मालिकेच्या शृखंलेत येणारी तिसरी कथा आहे ‘आई रिटायर होतेय’. ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.

या कथेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक सासू सत्यभामाच्या भूमिकेत दिसतील, शुभांगी गोखले अनघाची म्हणजेच आईची भूमिका साकारणार आहे. तर केतकी पालव म्हणजेच सून ऋचा, आणि स्मिता शेवाळे म्हणजे मुलगी समीराच्या भूमिकेत झळकणार आहे. या कथेतून आईच्या भूमिकेत असलेली अनघा एक नवा विचार मांडते आईलाही निवृत्ती हवीच ना? आता बघूया ह्या कथेत अनघा आपले विचार, निर्णय कसं सांगते? तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं…

पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकत्र, अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण

अनघा म्हणजेच ‘आई’ शाळेतून निवृत्त होणार आहे. तिची मुलगी, सून आणि सासू सगळ्यांच्या मनात एकच अपेक्षा आहे, की आता आई घराची संपूर्ण जबाबदारी उचलणार. आईला काय हवं आहे ? तिची काय इच्छा आहे ? याचा विचार न करता सगळ्यांनी अगदी सोयीस्करित्या हे ठरवले आहे. हे असंच बऱ्याच घरातील वास्तव असतं. आई म्हणजे ‘बॅकअप’ अशी सर्वांची सवयच झाली आहे. पण यावेळी या सगळ्या पल्याड जाऊन आई वेगळा निर्णय घेते. शाळेतून निवृत्त झाल्यांनतर स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईपणातून देखील निवृत्ती घ्यायची असं ठरवते. सर्वांच्या अपेक्षांना छेद देत स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीनं जगायचं ठरवते. आईचा हा निर्णय ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. पण नक्की आईच्या मनात काय आहे ? तिचं कोणतं स्वप्न आहे जे तिला पूर्ण करण्याचे आहे ? त्यामध्ये तिला घरच्यांची साथ मिळेल ? हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.

Kamal Haasan Birthday: वयाच्या ५ व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, एकाच चित्रपटातून साकारल्या १० भूमिका

Web Title: A new series will be presented to the audience on colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainemnt News
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेची डेट ढकलली पुढे; ७ डिसेंबर नाही तर, ‘या’ दिवशी होणार फिनाले
1

Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेची डेट ढकलली पुढे; ७ डिसेंबर नाही तर, ‘या’ दिवशी होणार फिनाले

सलमानबद्दलचा प्रश्न ऐकून भावाला आला राग, अरबाज खानचा का झाला संताप? मीडियाला फटकारत म्हणाला,…
2

सलमानबद्दलचा प्रश्न ऐकून भावाला आला राग, अरबाज खानचा का झाला संताप? मीडियाला फटकारत म्हणाला,…

९०च्या दशकातील स्टार, काम मिळत नसल्याने ‘या’ अभिनेत्यावर आली होती भीक मागण्याची वेळ
3

९०च्या दशकातील स्टार, काम मिळत नसल्याने ‘या’ अभिनेत्यावर आली होती भीक मागण्याची वेळ

“लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र, ‘या’ दिवशी होणार शुभारंभ
4

“लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र, ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.