Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dnyanada Ramtirthkar : काव्याची लगीनघाई, ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच अडकणार लग्नबंधणात, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIDEO VIRAL

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 23, 2025 | 02:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नानंतर होईलच प्रेम फेम ज्ञानदा अडकणार लग्नबंधणात
  • अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा
  • मेहंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
 

या वर्षात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले आहे. आता अजून एक अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी नुकताच मेहंदी सोहळा पार पडला. याचा खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, ”माझ्या हातावर सुंदर मेहंदी आहे अन् माझ्या मनात तो आहे #HD”असा हॅशटॅग तिने तिच्या पोस्टवर दिला आहे. तसंच तिने कॅप्शनमध्ये अंगठीची इमोजीही पोस्ट केलीय. त्यामुळे ज्ञानदा लवकरच लग्नबंधणात अडकणार असून तिने गुपचूप साखरपुडाही उरकल्याचं बोललं जातय.

प्रेक्षकांच्या लाडक्या काव्याने अजूनही तिच्या नवऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. तरीही तिने दिलेल्या हिंटमुळे असं समजत आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव H अक्षरावरून सुरू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्ञानदाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या हातावर मेहंदी अन् हिरवा बांगड्यांचा चुडा पाहायला मिळत आहे. यावर ज्ञानदाने लिहिलं, ठरंल कळवतो लवकरच # HD Love असं कॅप्शन तिने दिलं आहे.

‘धुरंधर’ला मागे टाकून ‘या’ चित्रपटाने केली 28,741,500,000 कोटींची कमाई, परदेशात 7,89,42,55,600 कोटींचे Collection

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी सेलिब्रिटिंनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, रेश्मा शिंदे, साक्षा गांधी या अभिनेत्रींनी खास कमेंट्स करत तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांकाने निकला खाऊ घातला ‘भयानक वासाचा’ भारतीय पदार्थ, कपिल शर्मा शो मध्ये देसी गर्लने केला भन्नाट खुलासा; Video Viral

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही आनंददायी बातमी ठरली आहे. मात्र, ज्ञानदाचा होणारा नवरा कोण आहे, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. चाहत्यांमध्ये हेही उत्सुकता आहे की, होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि अधिक माहिती तिने कधी जाहीर करणार.तिचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत असून सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा जोरदार सुरू आहे. लग्नाबाबत अधिकृत माहिती आणि नवऱ्याची ओळख लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Actress dnyanada ramtirthkar to tie the knot soon mehendi video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

‘मर्दिनी’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, श्रेयस तळपदे घेऊन येतोय स्त्रीच्या सामर्थ्याची कथा
1

‘मर्दिनी’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, श्रेयस तळपदे घेऊन येतोय स्त्रीच्या सामर्थ्याची कथा

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता  OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या
2

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस
3

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस

दारू, नशा आणि धोकेबाजी… गँग्स ऑफ वासेपूर  फेम ‘या’ अभिनेत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशांमुळे खळबळ
4

दारू, नशा आणि धोकेबाजी… गँग्स ऑफ वासेपूर फेम ‘या’ अभिनेत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशांमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.