(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
निर्मिती विश्वात कोठारे व्हिजन हे नाव अगदी परंपरागत असलेलं नाव आहे. या निर्मिती संस्थने आजवर अनेक अफलातून आणि सुपरहिट कलाकृती घडवल्या आहेत. उत्तम प्रोजेक्ट उत्कृष्ट कथा घडवणाऱ्या कोठारे व्हिजनची सर्वोत्तम मालिका म्हणजे झी मराठी वरची “सावळ्याची जणू सावली” ही मालिका. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाल आहे. तसेच आता मालिकेने आठ पुरस्कार जिंकून स्वतःचे वर्चस्व मिळवले आहे.
बॉबी देओलनंतर, श्रीलीलाचा जबरदस्त लूक रिलीज, ‘Agent Mirchi’ मध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत
नुकताच झी मराठी पुरस्कार मोठ्या दिमाखात संपन्न झाला आणि या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजन निर्मिती असलेल्या “सावळ्याची जणू सावली” या मालिकेने तब्बल आठ पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट मलिका, नायक – नायिका , विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, बेस्ट कपल , लोकप्रियकुटुंब, मराठी झी ५ मोस्ट वॉच शो, अश्या आठ पुरस्कारांनी या मालिकेचा सन्मान करण्यात आला. या सगळ्या सोहळ्यात अभिनेता आदिनाथ कोठारेने अजून एक मोठी घोषणा करून रसिक प्रेक्षकांना खास सरप्राइज दिले आहे. झी ५ मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच एका वेबशो ची घोषणा करून प्रेक्षकांना खुश केले आहे. अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका आदिनाथ या वेब सीरिजसाठी साकारणार आहे.
मराठी इंडस्ट्रीमधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन “धनंजय” या वेब सीरिज ची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेब शो मधून उलगडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आदिनाथ पुन्हा दुहेरी भूमिका बजावणार असल्याचं समजलं आहे. निर्मिती आणि अभिनय या दोन्ही भूमिका तो या सीरिजसाठी करणार आहे.
या बद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला, “एकीकडे आमची निर्मिती असलेल्या मालिकेला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळणं हे गोष्ट आमच्यासाठी खूप खास आहे. त्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमच खूप खूप अभिनंदन आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज हे पुरस्कार आम्हाला मिळाले आहे. प्रेक्षकांनी कायम आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि म्हणून आता वेब शोच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहोत. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल”. असे तो म्हणाला आहे.