
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
सूरज लग्नामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हता. त्याच्या चाहत्यांनी शेअर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून सर्वांना सूरजच्या लग्नातील खास क्षण पाहायला मिळाले होते. मात्र आता सुरजने देवदर्शन झाल्यावर आपल्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो संजना आणि सूरज यांच्या प्री वेडिंगचा आहे.हा फोटो पोस्ट करत सुरजने कॅप्शनमध्ये लिहिले,” जी होती मनात तिच बायको केली… आमचे लव्ह मॅरेज यशस्वी झाले!, सूरजने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे.
लग्नानंतर सुरज आणि संजना सर्वात आधी जेजुरीला गेले होते. जेजुरी गडावर जाऊन दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेतले. याचे खास व्हिडिओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुरजने लिहिले, ”मल्हारी माझा जगाचा राजा,आलोय जोडीने दर्शनाला” असे कॅप्शन त्याने दिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी त्यांना कमेंट्स करून आर्शिवाद दिला आहे.
नात्यांची गोड- कडू बाजू दाखवणारं, ‘एकदा पाहावं करून’ नाटक रंगभूमीवर! ‘या’ दिवशी होणार शुभारंभ