Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार…

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारीला उदयपूरमधील ITC मेमेंटोससह आलिशान हॉटेल्समध्ये रॉयल लग्नबंधनात अडकले. इथल भाडं ऐकाल तर अवाक् व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 08:23 AM
या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार...

या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार...

Follow Us
Follow Us:
  • दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न पार पडलं आहे.
  • दोघांचाही शाही विवाहसोहळा उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला.
  • चला या हॉटेलविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रॉयल वेडिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार असून 24 फेब्रुवारीपासून विविध लग्नसमारंभांना सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणारे हे भव्य सोहळे उदयपूरमधील आलिशान हॉटेल्समध्ये पार पडणार आहेत.

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

ड्रीम वेडिंगसाठी खास निवडलेली प्रॉपर्टी

लग्न समारंभासाठी ITC Mementos Udaipur या लक्झरी रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. उदयपूर शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेले हे हॉटेल निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. जंगलाच्या सान्निध्यात आणि अरावली पर्वतरांगांच्या कुशीत असलेली ही प्रॉपर्टी रॉयल अनुभव देणारी आहे. याशिवाय लग्नातील काही कार्यक्रम Raffles Udaipur आणि Fairmont Udaipur Palace येथे पार पडणार असल्याची माहिती आहे.

106 एकरांमध्ये पसरलेले वैभव

ITC मेमेंटोस हे सुमारे 106 एकर परिसरात विस्तारलेले आहे. येथे 117 पेक्षा अधिक सूट्स आणि व्हिला उपलब्ध आहेत. प्रशस्त बॉलरूम्स, मोठे आउटडोअर लॉन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट स्पेसेस असल्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जाते. हॉटेलमधील सर्वात आलिशान ग्रँड प्रेसिडेन्शियल सूट विशेष आकर्षण ठरतो. या सूटमध्ये ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण, खासगी गार्डन, प्रायव्हेट पूल, तसेच उच्च दर्जाच्या सुरक्षा सुविधा दिल्या जातात. या सूटचा एका रात्रीचा खर्च साधारण दोन लाख रुपयांपासून सुरू होतो, अशी माहिती समोर आली आहे.

खोल्यांचे दरही तितकेच आकर्षक

या हॉटेलमधील सामान्य खोलीसाठी साधारण 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. पाहुण्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हॅली व्ह्यू व्हिला, लेक व्ह्यू व्हिला, प्रीमियम व्हिला, अरावली सूट आणि मेमेंटोस सूट यांचा समावेश आहे. तसेच प्रेसिडेन्शियल आणि ग्रँड प्रेसिडेन्शियल सूट्सही उपलब्ध आहेत.

खोल्यांचे अंदाजे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • व्हॅली व्ह्यू व्हिला – ₹28,399 ते ₹28,666
  • व्हॅली व्ह्यू व्हिला ट्विन – ₹28,399 ते ₹28,666
  • लेक व्ह्यू व्हिला – ₹30,799 ते ₹31,088
  • प्रीमियम व्हिला – ₹34,799 ते ₹35,126
  • अरावली सूट – ₹57,199 ते ₹71,499
  • मेमेंटोस सूट – ₹73,199 ते ₹91,499
देवांचे देव महादेवालाही या जागी मिळाला होता दंड, प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी इथे भेट द्यायला हवी…

स्टार कपलची संपत्ती

रश्मिका आणि विजय यांनी दक्षिण भारतीय तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोघांचीही तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. या भव्य लग्नसमारंभासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 66 कोटी रुपये आहे, तर विजय देवरकोंडाची नेटवर्थ अंदाजे 50 ते 70 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Rashmika mandanna and vijay deverakonda wedding destination travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • rashmika mandana
  • Vijay Deverakonda
  • Wedding

संबंधित बातम्या

Rashmika-Vijay च्या ‘रणबाली’साठी आणखी प्रतीक्षा; 11 सप्टेंबरला नाही, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Rashmika-Vijay च्या ‘रणबाली’साठी आणखी प्रतीक्षा; 11 सप्टेंबरला नाही, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.