
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये नुकतेच वर वरचे वधू वर, देवभावळी आणि यांसारखे अनेक नाटकं गाजत असताना. आता आणखी एक नाटक रंगभूमीवर येऊन धडकणार आहे. या नाटकात पहिल्याच आपल्याला महेश मांजरेकर आणि भरत जाधव ही जोडी रंगभूमीवर एकत्र दिसणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट केल्यानंतर महेश मांजरेकर ही तब्बल २९ वर्षांनी पुन्हा नाटकाकडे वळले आहेत. ज्या नाटकाचं नाव ’शंकर जयकिशन’ आहे.
“घाणेरडी-घाणेरडी कपडे घालून…”, पापाराझींवर भडकल्या Jaya Bachchan; व्हिडिओ व्हायरल,म्हणाल्या…
’शंकर जयकिशन’ या नाटकाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. जे येत्या १९ डिसेंबरला रंगभूमीवर प्रदर्शित होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. अशातच या आगामी नाटकाच्या प्रमोशन दरम्यान ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी नाटकाला मिळणाऱ्या प्रेमाविषयी आपले ठाम मत मांडले आहे.
सध्या Ai जनरेट कलाकृतीचा वापर वाढतच चालला आहे. ज्यामुळे सिनेमाविश्वाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कलाकारांना त्यांची कला सादर करण्यास भविष्यात मोठी अडचणी निर्माण होतील हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. Ai जनरेट कलाकृती बाबत आपले मत काय? असे विचारले असता महेश मांजरेकर यांनी आपले स्पष्ट मत देत म्हणाले, ’Ai चा वापर करून बनवण्यात येणारे सगळ्या कलाकृती या फार काळ काही टिकणाऱ्या नाही आहेत. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.’ ’लोकांना हे आवडत ती चांगली गोष्ट आहे. याचे काही चांगले फायदे आणि तोटे सुद्धा आहेत.’
पुढे मराठी नाटकाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर ते म्हणाले, ‘ मी एवढंच म्हणेल की हे Ai मराठी नाटकाची जागा घेऊ शकत नाही. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी, कलाकार त्यांची कला नेहमी रंगभूमीवर लाइव्ह सादर करतात. हे काम Ai करू शकत नाही.’ असे मांजरेकरांनी म्हटले आहे.
कॉमेडियन भारती सिंगने सोशल मीडियावर फ्लॉन्ट केला बेबी बंप; फोटोशूट व्हायरल
’शंकर जयकिशन’ हे एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक असणार आहे. भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.