Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमोल कागणे यांचा "करणी" हा आगामी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरु झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 24, 2026 | 12:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
  • दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात
  • ‘करणी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती करून वेगळी ओळख निर्माण करणारे अमोल कागणे यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘करणी’ असे या बहुचर्चित चित्रपटाचे नाव असून, घोषणेनंतरपासूनच चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे दर्शन घेऊन या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकल्पाला एक सांस्कृतिक आणि भावनिक स्पर्श लाभला आहे.

अमोल कागणे यांनी त्यांच्या ‘अमोल कागणे स्टुडिओ’ या निर्मिती संस्थेमार्फत आजवर अनेक आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. हलाल, भोंगा, लेथ जोशी, सिंगल, बेफाम, कनिका, इमेल फिमेल, लॉकडाऊन लग्न यांसारख्या चित्रपटांनी सामाजिक, भावनिक आणि वास्तववादी विषय प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे. त्यामुळे ‘करणी’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव

‘करणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गोळे आणि सुमित संघमित्रा करत आहेत. दोन्ही दिग्दर्शकांनी आपल्या कामातून संवेदनशील आणि परिणामकारक कथनशैलीची छाप पाडली आहे. अनुभवी निर्माता आणि दिग्दर्शकांची ही जोडी एकत्र आल्यामुळे चित्रपटाची गुणवत्ता आणि सादरीकरणाबाबत सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.

या चित्रपटात दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनय बेर्डे, हार्दिक जोशी, प्रितम कागणे, दीप्ती देवी, आशय कुलकर्णी, नितेश चव्हाण, सागर पाठक आणि आरव पाठक हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या या कलाकारांची एकत्रित उपस्थिती चित्रपटाला अधिक बळ देणार आहे.

‘करणी’ या नावावरूनच चित्रपटाची संकल्पना काय असू शकते, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. परंपरा, चालीरिती, सामाजिक रूढी किंवा मानवी प्रवृत्ती यांवर भाष्य करणारी कथा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र निर्मात्यांनी कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

सध्या या चित्रपटाचे शूटिंग पुणे येथे सुरू असून, तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार सादरीकरणासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. फिल्मास्त्र स्टुडिओज तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. अनुभवी टीम, सक्षम कलाकार आणि वेगळ्या नावामुळे ‘करणी’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक उल्लेखनीय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीतच, आशयघन विषय, मजबूत तांत्रिक बाजू आणि प्रभावी सादरीकरण यांचा मिलाफ असलेला ‘करणी’ प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Director amol kagnes karni marathi film announced shooting begins in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
1

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
4

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.