Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव

'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६' हा मराठी कलेचा दिमाखदार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे. तसेच आता विजेते कलाकारांची नवे समोर आली आहेत. तसेच मराठी चित्रपटांनी देखील बाजी मारली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 24, 2026 | 11:20 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न
  • ‘आता थांबायचं नाय!’ चित्रपटाला मिळाला पुरस्कार
  • यंदाच्या विजेत्यांची यादी आली समोर
 

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ यंदा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. “मराठी गाजलंच पाहिजे” या दमदार थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेची श्रीमंती आणि आधुनिकतेची झळाळी यांची अप्रतिम सांगड अनुभवायला मिळाली. भव्यदिव्य सेट, आकर्षक सादरीकरणे आणि टाळ्यांच्या गजरात मराठी कलेचा गौरव करण्यात आला. संपूर्ण मंचावर मराठी भाषेचा आवाज घुमत होता आणि प्रत्येक क्षण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा ठरला.

गेल्या वर्षभरात मराठी चित्रपट आणि वेबविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी दाद दिलेल्या कलाकृतींना मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन

यंदाच्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे

ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर – दशावतार

सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – दिग्दर्शन – संतोष डावखर (गोंधळ)

सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेत्री – नंदिनी चिकटे (स्थळ), साजिरी जोशी (एप्रिल मे ९९)

सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेता – तारानाथ खिरटकर (स्थळ)

सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी – ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे’

MOST WATCHED ORIGINAL SERIES ON MARATHI Z5 – दशावतार

सर्वोत्कृष्ट चित्रपट – आता थांबायचं नाय !

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता सुभाष (जारण)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – शिवराज वायचळ (आता थांबायचं नाय !)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – दिलीप प्रभावळकर (दशावतार), भरत जाधव (आता थांबायचं नाय !)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ जाधव (आता थांबायचं नाय !)

यंदाच्या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय !’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधले. विविध प्रमुख श्रेणींमध्ये या दोन्ही चित्रपटांचा गौरव झाला आणि त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आपले वर्चस्व सिद्ध केले. कलाकारांच्या भावनिक भाषणांनी आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजराने वातावरण भारावून गेले.

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

हा पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून मराठी संस्कृतीचा उत्सव ठरला. “मराठी गाजलंच पाहिजे” हा संदेश अधिक ठामपणे देत या सोहळ्याने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान, तिची सर्जनशील ताकद आणि उज्ज्वल भविष्य यांचा विश्वास या कार्यक्रमाने पुन्हा एकदा दृढ केला.

तर मग, हा भव्य आणि दिमाखदार सोहळा शनिवार, १४ मार्च, संध्याकाळी ७ वाजता ‘झी मराठीवर’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आणि त्यांचे भरभरून मनोरंजन होणार आहे.

Web Title: Zee chitragaurav puraskar 2026 marathi awards full winners list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • zee cinema

संबंधित बातम्या

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
1

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
2

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

‘फ्रेम’साठी अमेय वाघने स्वीकारली वेगळी भूमिका; सांगितलं भूमिका निवडण्यामागचं कारण
3

‘फ्रेम’साठी अमेय वाघने स्वीकारली वेगळी भूमिका; सांगितलं भूमिका निवडण्यामागचं कारण

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ Music Launch मध्ये शिरला एक फॅन! Avadhoot Gupte ने दिलं मोठं गिफ्ट…
4

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ Music Launch मध्ये शिरला एक फॅन! Avadhoot Gupte ने दिलं मोठं गिफ्ट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.