(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखत बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटामधील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. ज्यामुळे कुबल कुटुंबाला आणि मराठी सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. या बातमीमुळे आता संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीची ही जवळची व्यक्ती कोण होती आपण आता जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे भाऊ आणि ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचं निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांना पक्षाघाताचा त्रास होत होता. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर त्यांनी प्राण सोडले आणि जगाचा निरोप घेतला. शनिवारीच त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि त्यांना एक मुलगी असा परिवार आहे. आता हे संपूर्ण कुटुंब शोकात आहे. त्यांना त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार श्रद्धांजली वाहत आहेत.
वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत कसलेले आणि संवेदनशील संकलक म्हणून ओळखले जात होते. साधारणपणे ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी संपादनाच्या क्षेत्रात काम केले. ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘परीस’, ‘चॅम्पियन्स’, ‘लढाई’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘स्नेक अँड लॅडर’ अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी संपादनाची जादू दाखवली. त्यांचं काम नेहमीच कथानकाला गती देणारे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार राहिलं आहे. त्यांचे काम अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आणि प्रशंसा करत आहेत.
Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच तांत्रिक दर्जा आणि कलात्मकतेसाठी नावाजले जाते. मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच एक दर्जा स्थापन केला आहे. वसंत कुबल यांच्यासारख्या लोकांच्या योगदानामुळे हे आणखी शक्य झालं आहे. त्यांचे अचानक जाणं म्हणजे या क्षेत्राने आपला एक आधारस्तंभ गमावला आहे. ते जरी आता आपल्यात असले तरी त्यांचं काम नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहणार आहे.