फोटो सौजन्य - JioHotstar Reality
सलमान खानच्या रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” चा वीकेंड का वार हा धमाकेदार झाला यामध्ये सलमान खानने काही स्पर्धकांची शाळा घेतली. सीक्रेट रूममधून घरात परतलेली नेहल चुडासमा घरातील स्पर्धकांचा पर्दाफाश करणार आहे. निर्मात्यांनी शोचा नवीनतम भागामध्ये अनेक स्पर्धकांचा खेळ उघड केला आहे. ज्यामध्ये नेहल तान्याचा बनावट चेहरा उघड करताना दिसत आहे. आगामी भागात, सलमान खानसोबत अभिषेक मल्हान आणि हर्ष गुजराल हे दिसणार आहेत.
कालच्या भागामध्ये नेहलला घरात खोट्याचा मुखवटा घातलेल्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर पाणी फेकण्यास सांगितले. त्यानंतर नेहलने तान्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकले आणि तिचा खेळ उघड केला. खरं तर, ‘वीकेंड का वार’ मध्ये, सलमान खान अमाल मलिकला फटकारताना दिसेल, तर दुसरीकडे, सलमान खान नेहलला घरात बनावट असल्याचे भासवणाऱ्या स्पर्धकांचे गुपिते उघड करण्यास सांगेल. गुप्त खोलीतून परतलेल्या नेहलने प्रेक्षक म्हणून सर्व स्पर्धकांचे खेळ पाहिले आहेत आणि आता तिला कळले आहे की हा खेळ कोण खेळत आहे आणि कोण खरा दिसत आहे.
बिग बॉस १९ च्या नवीनतम प्रोमोमध्ये, नेहलने तान्या मित्तलच्या चेहऱ्यावर पाणी फेकले आणि तिचा मास्क काढला. नेहल म्हणाली, “तान्या मित्तलने १०० मास्क घातले आहेत. तिने अमालसोबत एक वेगळीच कथा तयार केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना ती कोणता खेळ खेळत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.” नेहलच्या या खुलाशामुळे तान्याचा खेळ उघड झालाच नाही तर येत्या काळात घरात नेहल आणि तान्या यांच्यातील भांडणही होण्याची शक्यता आहे.
Nehal ne utaare teen gharwalon ke chehre se mukhaute aur khole unke raaz! 👁️ Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par. Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/APTZOd3Yjw — JioHotstar Reality (@HotstarReality) September 27, 2025
दरम्यान, या वीकेंड का वारमध्ये गौहर खान देखील सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी आणखी एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये गौहर अवेज दरबारला जागे करण्याचा इशारा देताना दिसत आहे. तिने अमाल मलिकलाही कडक शब्दांत फटकारले आहे. गौहरने सलमान खानसमोर अमालला ढोंगी म्हटले आहे. यासोबतच, वीकेंड का वारमधील एका स्पर्धकाचा प्रवासही संपत आहे.