(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
यंदा ऑगस्ट महिन्यात, ZEE5 वर सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला मराठी चित्रपट ‘जारण’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२५ मध्ये प्रचंड कमाई करून या चित्रपटाने अव्वल स्थान निर्माण केले आहे. अभिनयाचा विशेष ठसा उमटवणारी गुणी कलाकार अमृता सुभाषची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अखेर प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरलेला हा भयपट-थरारपट 8 ऑगस्ट रोजी केवळ ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
सत्य घटनेवर आधारित Tehran चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, जॉन अब्राहम दिसणार मुख्य भूमिकेत
ए अँड एन सिनेमा एलएलपी आणि ए 3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस प्रॉडक्शनच्या सहकार्याने अनीस बझ्मी यांनी सादर केलेला हा चित्रपट आहे. आणि दूरदर्शी लेखक हृषिकेश गुप्ते लिखीत- दिग्दर्शित ‘जारण’ चित्रपट बनवण्यात आला आहे. खोल दफन केलेल्या रहस्यांनी वेढलेल्या कुटुंबाच्या कथेत घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. भीतीचे अनामिक सावट, एक दीर्घकाळ दडपलेले रहस्य पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभूतपूर्व रहस्य आणि तीव्र भावनिक नाट्याचे मिश्रण असलेला हा सिनेमा ZEE5 वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आता जगभरातील प्रेक्षक ही थरारक कथा घरात आरामात बसून प्रादेशिक भाषेत अनुभवू शकतात. भय आणि सत्याच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रीच्या रूपात अमृता सुभाष सशक्त अभिनयाचे दर्शन घडवते, तिच्या व्यक्तिरेखेला असलेली भावनिक जोड हा कथेचा आत्मा आहे. अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख यांनीही सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.
चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “‘जारण’ सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.” असे ते म्हणाले..
निर्माते अमोल भगत म्हणतात, “चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मन भरून येते. थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढती आकडेवारी, आणि सोशल मीडियावरचा सकारात्मक प्रतिसाद हे सर्व पाहाता खरच खूप आनंद होतो. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आहे.” असे ते म्हणाले आहे.