(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस पावसाचा आनंद घेत आहे. निसर्गरम्य आणि हिसरवळ वातावरणात लोक फिरत आहेत आणि या हिरवळीचा आनंद लुटत आहेत. आणि अश्यातच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना या पावसाचा आनंद घेत नाही आहे, म्हणूनच बिग बॉसने त्याच्या घरात पाऊस पडला आहे. आणि या पाऊसात सगळे बिग बॉसचे स्पर्धक गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. घरातील प्रेम सदस्याने एका एका गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. निक्कीने ‘टीप टीप बरसा पाणी…’ या गाण्यावर डान्स करून सगळ्यांना घालाय केले, तर पॅडीने ढगाला लागली कळं… पाणी थेंब थेंब गळं या गाण्यावर डान्स करून धमाल केली. दोघांनीही पावसाचा आनंद लुटला.
निक्कीने केले घायाळ
निक्की गाण्यावर थिरकत असताना अरबाजचे संपून लक्ष तिच्याकडेच होते. निक्कीचं गाणं संपल्यावर अभिजित म्हणाला ”बिग बॉस गाणं परत वाजवा”. निक्कीचा डान्स पाहून घरातील सगळे सदस्यांनी या गाण्यावर ताल धरला. ‘बिग बॉस च्या घरातील सगळेच स्पर्धक गाण्यावर डान्स करताना दिसले आहेत. आणि पाऊसाचा आनंद घेताना दिसले आहेत. तसेच, हे करताना दिसलेच खूप खुश आणि मज्जा करताना दिसले आहेत.
हे देखील वाचा- अनिल कपूरने स्कार्लेट जोहान्सनसह TIME100 AI यादीमध्ये मिळवले अव्वल स्थान!
सुरज झाला बिग बॉसच्या घरातील कॅप्टन
दरम्यान आज ‘बिग बॉस’ च्या घरात कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. तसेच कलर्स मराठीने हा प्रोमो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅप्टनसी टास्क हा गुलीगत सुरज चव्हाण जिकंताना दिसला आहे. सुरज कॅप्टन झाल्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला आनंद झालेला दिसून येत आहे. एवढंच नाही तर, सुरज कॅप्टन झाल्यामुळे चाहत्यांना देखील खुप झालेला आहे. आणि त्यांनी या व्हिडीओ कंमेंट करून प्रतिसाद दिला आहे. तसेच सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील सगळ्या सदस्यांनी ‘झापूक झूपूक’ डान्स देखील केला आणि त्याला कॅप्टन रूम पर्येंत सोडले. आता कॅप्टन सुरज हे घर शांत आणि वैवस्थित ठेवणार की नाही हे पाहणं चाहत्यांसाठी जास्त उत्सुकतेचे आहे.