
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या घरात आज एक टास्क पार पडणार आहे. राशनच्या गोण्यांसाठी घरातील सदस्यांमध्ये दमदार राडा झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आज घरात राशन मिळवण्यासाठी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त राशनच्या गोण्या जमा करायच्या आहेत. या टास्कमध्ये जी टीम विजेता होईल त्यांना गोल्डन राशन कार्ड मिळणार आहे. तर, उर्विरित सदस्यांना ब्राँझ कार्डवरच समाधान मानावं लागणार आहे. या टास्कदरम्यान घरातील दोन स्पर्धकांमध्ये जोरदार जुंपणार आहे. रोशन भजनकर आणि ओमकार राऊत यांच्या जोरदार राडा होणार आहे. कलर्स मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे.या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे, रोशन ओमकारचा वाद सुरू आहे.
सर्वात आधी गोणी कोणी घेतली यावर यांच्यात वाद जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.यावेळी रोशन सर्वांना म्हणाला, माझी सटकली तर मी कोणाला ऐकत नसतो,” मी गोणी सर्वात आधी हातात घेतली.. हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. मी खोटं नाही बोलणार नाही, मी तसंच द्यायला तयार आहे. मी उपाशी ही राहिला तयार आहे. ” आता हा टास्क जिंकून कोणत्या सदस्यांना सुखसुविधा मिळणार हे पाहुया आजच्या भागात.
राशनच्या गोणी मिळवण्यासाठी कोण काय काय करणार आणि या टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहेआता हा टास्क जिंकून कोणत्या सदस्यांना सुखसुविधा मिळणार हे पाहुया आजच्या भागात.