
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी ६’ या प्रेक्षकांच्या लोकप्रिय शोला सुरुवात झाली आहे. हा शो नुकताच सुरु झालेला असला तरी स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसांपासून वादाची ठिणगी पेटलेली दिसत आहे. आता अश्यातच ‘बिग बॉस मराठी ६’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये आता लवकरच घरात नवीन भांडण पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच हा वाद महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि राजकारणी व्यक्तिमहत्व दीपाली सय्यद आणि लावणी कलाकार राधा पाटीलमध्ये होणार असल्याचे दिसते आहे.
‘बिग बॉस’ने शेअर केला नवा प्रोमो
Bigg Boss Marathi 6 च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दीपाली सय्यद घरातील सदस्यांना सांगतांना दिसत आहे की, ‘लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे, परंतु त्याचा दर्जा आता ढासळत चालला आहे. तुम्ही एक बार डान्सर स्टेजवर घेऊन येता.’ असे ती म्हणताना दिसली आहे. यावर राधा पाटील भडकलेली दिसत आहे. आणि गार्डन एरियामध्ये तिचा राग व्यक्त करताना दिसत आहे. राधा दीपाली सय्यदच्या वक्तव्यावर म्हणाली, ‘दीपाली ताई मला आणि माझ्या लावणीबद्दल आता खूप वाईट बोलत आहे. मी पण तिची लायकी काढू शकते, तिचं कुठे नाव आहे डान्समध्ये…’ असे म्हणताना राधा दिसत आहे.
‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील…’, भारतात “संभावामि युगे युगे” चा पहिला शो दणक्यात पडला पार!
तसेच ‘बिग बॉस’ च्या नव्या सीझनमध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,, सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. तसेच आज नव्या भागात नवा पहिला टास्क देखील रंगणार आहे. आणि नवीन राडा, मज्जा-मस्ती देखील पाहायला मिळणार आहे.