
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी सीजन ६’ हा लोकप्रिय शो सुरु होऊन आता आठवडा झाला आहे. हळूहळू या शोचे रंगत वाढत चालत आहे आणि खेळात मज्जा येत असताना दिसत आहे. घरामध्ये असलेल्या प्रत्येक स्पर्धकाचा आता एक चाहता वर्ग बनत असल्याचे दिसत आहे. बिग बॉस शो सुरु झाले की प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे भाऊच्या धक्क्याची. त्या शनिवारी आणि रविवारीची जिथे रितेश स्पर्धकांची शाळा घेतो, त्यांना त्यांचा खेळ समजवून सांगतो, नवनवीन खेळ घेतो आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतो. या भाऊच्या धक्क्यावर अभिनेता रितेश विलासराव देशमुख येऊन कोणत्या स्पर्धकांची फिरकी घेणार हे पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर रिलीज; कधी होणार चित्रपट प्रदर्शित?
काल या सीझनचा पहिला भाऊचा धक्का पार पडला,ज्यामध्ये रितेशने सगळ्यांना त्यांचा खेळ समजावून सांगितला. त्यावेळी रितेशने तन्वी कोलतेला भरपूर झापलं देखील. शिवाय रुचिता जामदारची सुद्धा खूप कान उघडली केली. दिपाली सय्यद ला सुद्धा त्याने तिची चूक दाखवून दिली. याशिवाय ज्या स्पर्धकांनी संपूर्ण आठवड्याभरात उत्तम कामगिरी केली त्याचे कौतुकही केले. आणि जे स्पर्धक आठवड्याभर दिसले नाही त्यांना जागे होण्यास देखील सांगितले. आता या शोच्या रविवारच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये खूप धमाल होताना दिसणार आहे.
आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये स्पर्धक घरात धमाल मस्ती करताना पाहायला मिळणार आहेत. यावेळी या घरात चला हवा येऊ द्या मधील विनोदवीर सागर कारंडेने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुणाल सोनवणे हा देखील खेळात सहभागी झाला. रविवारच्या एपिसोडमध्ये या दोन विनोद वीरांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. दोघेही घरातल्या इतर स्पर्धकांना खळखळून हसवणार आहेत. तसेच्या दोघांचे विनोद आणि त्यांनी घेतलेली स्पर्धकांची फिरकी हे दोन्ही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
करण हा सोशल मीडियावर त्याच्या सोनावणे वहिनी या पात्रासाठी ओळखला जातो. तर त्याच्या साथीला सागर आता कारंडे वहिनी बनून परफॉर्मन्स सादर करणार दिसणार आहे. विशालच्या बॉडीवरून ते मस्करी करताना प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. या दोघांचा परफॉर्मन्स पाहून रितेश सुद्धा भरपूर हसतो आहे. हा प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकही आजचा एपिसोड पाहायला उत्सुक आणखी वाढली आहे. सोनवणे वहिनी या पात्राचे चाहते गेले कित्येक दिवस आतुरतेने वाट पाहत होते. आता शोमध्ये सोनवणे वहिनींना पाहिल्यांनंतर तेही खुश झाले आहेत. शिवाय सागर कारंडेने गेला काही काळ चला हवा येऊ द्या मधून निरोप घेतला होता. त्याला पुन्हा एकदा विनोद करताना पाहून त्याचा चाहता वर्ग देखील आनंदी झाला आहे.