
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता संघर्षाची ठिणगी पडायला सुरूवात झाली आहे. घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहे. सदस्यांमधील संवाद आता वादात रूपांतरित होताना दिसत आहेत.नुकत्याच कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या नवीन प्रोमोमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड मोठे भांडण झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच या दोघांमध्ये या आधी ही भांडण झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आणि या भांडणात अनुश्रीने राकेश बद्दल एक चुकेचं वक्तव्य केलं होते. त्यावेळी मराठी कलाकरांनी राकेशला पाठिंबा दर्शवला होता.
आता या नवीन प्रोमोमध्ये राकेश कमालीचा संतापलेला दिसत असून तो घरातील कामाच्या मुद्द्यावरून अनुश्रीवर निशाणा साधताना दिसतो आहे. राकेश म्हणाला, “घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?” असा प्रश्न राकेशने उपस्थित केला आहे. राकेशचा हा आक्रमक अवतार पाहून घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत. दुसरीकडे, अनुश्रीनेही राकेशला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि ‘चूप’ राहण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राकेश वारंवार तिला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीनेही त्याला तितक्याच प्रखरपणे उत्तर दिले आहे.
घरात शांत राहणारा राकेश यावेळी इतका का चिडला? या भांडणात कोणाची बोलती होणार बंद? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.