(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सोहम बांदेकर, स्वानंद केतकर यांच्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेता लग्नबंधणात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची तारिख जाहिर केली होती. इतकंच नाही तर गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलने प्रपोज देखली केलं होतं. या वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्री रसिका वाखारकरने शुभांकपर उंब्नानी यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला आहे. त्यानंतप यापाठोपाठा सिद्धार्थ खिरिडच्या घरी देखील लग्नाची लगबगसुरू झाली आहे. नुकताच सिद्धार्थ- मैथिलीचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सिद्धार्थने सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदीचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या मेहंदी सोहळ्यासाठी या दोघांनी जांभळ्या रंगाची कपडे परिधान केली आहेत. मैथिलीच्या हातावर आता सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली आहे. या फोटोंमध्ये त्यांच्या आनंदाचे काही खास क्षण ठिपले गेले आहेत.
सिद्धार्थ खिरीड लवकरच डॉ मैथिली भोसेकर सोबत लग्न करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मैथिलीने परदेशात पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्री-वेडिंगसाठी त्यांनी खास वेस्टर्न लूक केला होता.
‘फ्रेशर्स’,’ मुलगी झाली हो’, ‘राणी मी होणार’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ खिरीड. आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.






