
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ 6 च्या घराचा दरवाजा उघडून आता फक्त तीन दिवस उलटले आहेत, पण वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडायला सुरूवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, यामुळे घरातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सागर कारंडे आणि तन्वी यांच्यात टोकाचे वाद झाले असून, घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
सागर कारंडेवर तन्वीने डागली तोफ
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पहिल्या नॉमिनेशन’ टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली आहे. इतकंच नाही तर, “सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत” असं खळबळजनक विधान तिने केलं आहे. तन्वीच्या या भूमिकेमुळे सागर प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला.
“एवढी तर अक्कल पाहिजे!” सागरचा तन्वीला उत्तरं”
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणाला, “एवढी तर अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय!” यावर तन्वीनेही माघार न घेता “मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही” असं ठणकावून सांगितलं. वादाच्या भरात सागरने तिला मध्ये न बोलण्याचा इशारा दिला आणि सांगितले, मी तुला आधीच म्हटले होते मी बोलताना मध्ये बोलायचे नाही. ज्यावर तन्वीने “मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार” असं सडेतोड उत्तर दिलं आहे.
ही घरातील नवी रणनीती?
नेहमी शांत राहणारा सागर आणि आक्रमक तन्वी यांच्यातील हा वाद घराला कोणत्या वळणावर नेणार, हे पाहणं रंजक ठरेल. नॉमिनेशनच्या भीतीपोटी हे सदस्य एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत का?असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. या वादाचे परिणाम काय होतील, हे पाहण्यासाठी, कोण होणार नॉमिनेटेड ? आणि कोण होणार सेफ ? हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.
बिग बॉस’ च्या नव्या सीझनमध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,, सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे हे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या नव्या भागात दिसत आहेत.