(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
परदेशात कुठे रीलिज होणार सिनेमा?
अलिकडेच ‘क्रांतिज्योती…’ची निर्मिती संस्था असणाऱ्या’ चलचित्र मंडळी’च्या इन्स्टाग्राम पेजवरुन अशी पोस्ट शेअर करण्यात आली की, ”क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आता भारतासह दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन येथे खास प्रदर्शित.’ ही आनंदाची बातमी शेअर करताना टीमने अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे कलाकार चाहत्यांसह ही आनंदची बातमी शेअर करताना दिसले आहेत.
व्हिडिओमध्ये क्षितीने म्हटले की, ‘नमस्कार आम्ही आहोत क्रांतिज्योती विद्यालयचे विद्यार्थी आणि आम्ही आमचा सिनेमा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ घेऊन येणार आहोत, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये…’ तर अमेयने म्हटले की, ‘भारतात गाजणारा आमचा हा सिनेमा आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन… सगळीकडे खास तुमच्यासाठी.’ सिद्धार्थने याकरता कोणाशी संपर्क साधायचा याविषयीही माहिती सांगितली.
अभि – क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष सुरु; ‘लग्नाचा शॉट’ चे शीर्षक गीत रिलीज
महाराष्ट्रात गाजत असलेला हा मराठी चित्रपट आता परदेशातही गाजणार आहे, यावरुन प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. आणि व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहेत. कमेंट करत अनेक चाहत्यांनी चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे. दरम्यान या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचे झाल्यास, चित्रपटाच्या रीलिजनंतर अवघ्या १३ दिवसात ‘क्रांतिज्योती…’ चित्रपटाने ने ११.४० कोटींची कमाई केली आहे.






