Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता? बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ ठरली, पाहा नवीन प्रोमो

Bigg Boss Marathi 5 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा भव्यदिव्य आणि बहुप्रतीक्षित महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 04, 2024 | 02:34 PM
कोण होणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता? बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ ठरली, पाहा नवीन प्रोमो

कोण होणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता? बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ ठरली, पाहा नवीन प्रोमो

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा भव्यदिव्य आणि बहुप्रतीक्षित महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनप्रमाणेच रितेश देशमुखलाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. रितेश भाऊंची लयभारी स्टाईल, तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेझ, त्यांची धमाल मस्ती, कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला.

हे देखील वाचा – गोविंदाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, अभिनेता व्हीलचेअरवर बसलेला दिसला!

आता या सर्व गोष्टी कुठेतरी प्रेक्षक नक्कीच मिस करणार आहेत. कारण आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजेपासून ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. यंदाचा सीझन खूपच खास ठरणार आहे. आतापर्यंत सर्वच सीझनमध्ये टॉप ५ कंटेस्टंट पाहायला मिळाले. पण यंदाच्या सीझनला प्रेक्षकांना सुपर ६ कंटेस्टंट पाहायला मिळणार आहेत. त्या टॉप ६ स्पर्धकांपैकी एकाच्या नावावर बिग बॉसची ट्रॉफी येणार आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या ‘भाऊच्या धक्क्या’ने टीआरपीचा उच्चांक गाठला होता. प्रत्येक वीकेंडला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचं कामही रितेशने अगदी चोख रित्या पार पाडलं.

 

महाराष्ट्राच्या लाडक्या माऊलीने अर्थात रितेशने ‘बिग बॉस’प्रेमींच्या मनावर आपली छाप पाडली. आपल्या स्टाईलने त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ला एक वेगळंच ग्लॅमर आणलं. आज घरात काय घडणार? कोण कसा खेळ खेळतोय? कोण काय रणनीती आखतोय? कोणाचा प्रवास कधी संपणार? अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर होतात. प्रेक्षकांच्या या कार्यक्रमाला आणि रितेश भाऊंच्या होस्टिंगला मिळत असलेल्या उत्स्फू्र्त प्रतिसादामुळे टीआरपीतही या कार्यक्रमाने घवघवीत यश मिळवले. पण टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ग्रँड फिनालेला सर्व सदस्य आता परस्परांमधली भांडणे विसरून बहारदार गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स देणार आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनबद्दल रितेश देशमुख म्हणाला की, ” ‘बिग बॉस मराठी’चा हा सीझन अनेक सरप्राईजेस आणि ट्विस्टने भरलेला होता. प्रत्येक आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे उच्चांक गाठले. छोट्या पडद्यावरचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजला. गेले दोन आठवडे व्यस्त चित्रिकरणामुळे मला भाऊच्या धक्क्यावर येता आलं नाही. तुम्ही सर्वांनी माझी आठवण काढलीत, याचा मला अंदाज आहे. पण आता ग्रँड फिनालेला मी या दोन आठवड्याची कसर भरून प्रेक्षकांना मनोरंजनाची तुफान मेजवानी देणार आहे. खूप सरप्रायजेसनी , उत्सुकतेने भरलेला हा ग्रँड फिनाले असेल”.

हे देखील वाचा- राशी खन्ना, विक्रांत मॅसी ‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी नवरात्री उत्सवात पोहचले!

‘बिग बॉस मराठी’बद्दल प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) केदार शिंदे म्हणाले,”बिग बॉस मराठी’च्या या पर्वाला संपूर्ण महाराष्ट्राचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र आणि बॅालीवूडचे सुपरस्टार रितेश भाऊंनी या सिझनला चार चॅांद लावले. या पर्वातील सदस्यांनी, त्यांच्या भिन्न स्वभावाने या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. हा सीझन उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमातील सर्व सदस्यांची आज घराघरांत चर्चा आहे. आता आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची नजर दिमाखदार ग्रँड फिनालेवर खिळली आहे. आणि गेले दोन आठवडे परदेशातील चित्रीकरणामुळे रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्या’ वर येऊ शकले नव्हते. त्यामुळे ग्रॅंड फिनालेला भाऊंच्या उपस्थितीत होणाऱ्या या फिनालेसाठी घरातील सदस्य आणि अवघा महाराष्ट्र आतूर आहे.”

6 ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी 6 वाजता, ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ची सांगता होताच ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.

Web Title: Bigg boss marathi season 5 grand finale ritesh deshmukh host the grand finale of bb marathi s5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 02:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.