Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला मेल आलाय…’, ‘या’ लावणी डान्सरला Bigg Boss Marathi ची ऑफर? व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

बिग बॉस मराठी 6मध्ये गौतमी पाटील दिसणार नाही परंतू एका लावणी डान्सरची बिग बॉस मराठी 6 मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 23, 2025 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिग बॉस मराठी 6मध्ये गौतमी पाटील दिसणार?
  • या लावणी डान्सरला आली बिग बॉस मराठीची ऑफर
  • बिग बॉस मराठी 6चं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार
बिग बॉस हिंदीचा सीझन संपल्यानंतर लगेच प्रेक्षकांना उत्सुकता लागते ती म्हणजे, बिग बॉस मराठीची लवकरच महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ बिग बॉस मराठी सीझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. बिग बॉस मराठी 5 प्रमाणे बिग बॉस मराठी 6चं सूत्रसंचालनही रितेश देशमुख करणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 6’चा धमाकेदार प्रोमो रिलीज झाल्यापासून चाहते हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या प्रोमोमध्ये महाराष्ट्रचा लाडका भाऊ अर्थात रितेश देशमुखचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ ११ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक नावंही समोर आली आहेत.

बिग बॉस मराठी 6मध्ये गौतमी पाटील दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. या शोची ऑफर गौतमी पाटीलला मिळाली होती. मात्र गौतमीने यावर स्पष्टीकरण देत बिग बॉस मराठीची ऑफर नाकारल्याचे आणि शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये गौतमी पाटील दिसणार नाही परंतू एका लावणी डान्सरली बिग बॉस मराठी 6 मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी ६ साठी लावणी डान्सर सायली पाटीलला ऑफर मिळाली आहे.

प्रियांकाने निकला खाऊ घातला ‘भयानक वासाचा’ भारतीय पदार्थ, कपिल शर्मा शो मध्ये देसी गर्लने केला भन्नाट खुलासा; Video Viral
सायली पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सायली म्हणताना दिसते की, तिला ‘बिग बॉस मराठी’च्या टीमकडून मेल आला आहे. “दोन दिवसांपूर्वी मला बिग बॉस मराठीकडून मेल आलाय. तुम्ही शोसाठी इंटरेस्टेड आहात का, असा मेल आहे. आता मी काय करू? मला बिग बॉसमध्ये जायला हवं का नाही? तुम्हाला काय वाटतं, ते कमेंटमध्ये सांगा,” असं ती व्हिडीओमध्ये म्हणते.

 

मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्यासाठीच्या लढ्याची हाक! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ‘हाकामारी’ गाणं प्रदर्शित

सायलीचा हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नसून एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कधी आणि कोणत्या संदर्भात शूट करण्यात आला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सायलीच्या मेन अकाऊंटवर हा व्हिडीओ दिसत नसल्याने तिला खरंच ‘बिग बॉस मराठी’च्या टीमकडून अधिकृतरित्या विचारणा झाली आहे का, यावर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सायली पाटील बिग बॉस मराठीच्या आगामी सीझनमध्ये सहभागी होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र व्हायरल व्हिडीओमुळे तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सायली किंवा बिग बॉस मराठीच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 offer for lavani dancer sayali patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Gautami patil
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

‘तर ही असणार यंदाची थीम…’, Bigg Boss Marathi 6 बाबत मोठी अपडेट समोर; ‘हे’ सदस्य रंगवणार खेळ
1

‘तर ही असणार यंदाची थीम…’, Bigg Boss Marathi 6 बाबत मोठी अपडेट समोर; ‘हे’ सदस्य रंगवणार खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.