
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आता १५ दिवसांत १४ कोटी ९० लाखांहून अधिक कमाई केली असल्याचे समजले आहे. अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक देखील केले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या १५ दिवसांतच भारतात १५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेक कलाकारांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!
काय आहे चित्रपटाची कथा?
मराठी मधील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने अतिशय संवेदनशील विषयाला मनोरंजनाची जोड देत हा चित्रपट बनवला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेला वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनय, अमेय वाघची विनोदी शैली आणि प्राजक्ता कोळीचा मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरले आहे. चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि सचिन खेडेक, चिन्मयी सुमित या सगळ्यांना उत्तम अभिनय पाहायला मिळाला आहे.
बॉलीवूड चित्रपटांना दिली टक्कर
विशेष म्हणजे, याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या मोठ्या बजेटच्या बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत ‘क्रांतीज्योती विद्यालय’चा उत्तम कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधर, इक्कीस, अवतार हे बॉलीवूड सिनेमे गाजत असताना. मराठी चित्रपटाने आपला पाया भक्कम ठेवला आहे. आता हा चित्रपट २० कोटींचा टप्पा नक्की पार करेल अशी खात्री आहे.