(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपटगृहात १२ सप्टेंबरला नुकताच रिलीज झालेला ‘दशावतार’ प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. त्यांच्या भूमिकेने या चित्रपटाचा दर्जा आणखी उंचावला आहे आहे. प्रेक्षक ‘दशावतार’ चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहे. अश्यातच रविवारी दुप्पट कमाई करून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडले आहेत. तसेच या चित्रपटाची एकूण कमाई किती झाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज
कोंकणातील लाल माती प्रमाणे मनात कोरला जाणारा ‘दशावतार’ ने प्रेक्षकांची मने जिंकला आहे. बाबुली मेस्त्रीची ही कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तसेच प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रेम देखील देत आहे. ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई करून आपले स्थान बॉक्स ऑफिसवर बळकट केले आहे. तसेच रविवारी दुप्पट कमाई करून, या चित्रपटाचे सिनेमागृहातील शो आणखी वाढवण्यात आले आहेत.
‘दशावतार’ चित्रपटासोबतच मराठी चित्रपट ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे देखील प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांच्या तुलनेत दशावतारने पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग केली आहे. आणि आपला पाट भक्कम केला आहे. ‘दशावतार’ चित्रपटामधील संपूर्ण स्टारकास्टचा अभिनय पाहण्यासारखा आहे. सगळ्यांचे कामाचे लोकं कौतुक करत आहेत. ‘दशावतार’ चित्रपटाचा प्रभाव हा चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही प्रेक्षकांच्या मनावर राहत आहे. आता हा चित्रपट पुढे आणखी किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘दशावतार’ चित्रपटाने विकेंडला बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमानं सर्वाधिक कमाई करण्यात यश मिळवलं आहे. sacnilkच्या रिपोर्टनुसार, दशावतार सिनेमानं पहिल्या दिवशी ५८ लाखांची कमाई केली. तसेच ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटांपेक्षा दशावतारची कमाई जास्त होती. त्यानंतर विकेंडच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दशावतारने १.३९ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी दुप्पट कमाई झाली.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधील पहिले डबल एव्हिक्शन पडले महागात, एकावेळी दोन स्पर्धक घराबाहेर
दशावतार चित्रपटाने विकेंडच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी पहिल्या दोन दिवसांचे रेकॉर्ड्स ब्रेक केलेत. रविवारी सिनेमानं तब्बल २.४ कोटींची कमाई करण्यात यश मिळवले आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दशावतार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले आहेत. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. सिनेमाची ऐकूण कमाई आता ४.३७ कोटी रुपये इतकी झाली आहे. तसेच ‘दशावतार’ हा चित्रपट एक सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे.