
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या बॉलिवूडमध्ये धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंच आहे पण या चित्रपटातील FA9LA हे गाण सर्वांना वेड लावत आहे. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेली डान्स स्टेप चांगलीच व्हायरल झाली.‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली ‘रहमान डकैत’ ही भूमिका आणि गाण्यातील त्याची दमदार एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fa9la हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून अनेक युजर्ससह कलाकार मंडळीही या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. या ट्रेंडला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनाही ही डान्स स्टेप करण्याचा मोह आवरला नाही.
अशातच नृत्यांगाना गौतमी पाटीलसुद्धा अक्षयच्या गाण्यावर थिरकली आहे. गौतमीचा हा व्हायरल व्हिडिओ सातारा हायवेवरील एक टोलनाक्याजवळचा आहे. टोलनाक्याजवळ भर रस्त्यात गौतमी पाटीलने FA9LA गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी गौतमीने हटके लूकने देखील चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. अक्षय खन्नाची व्हायरल स्टेप कॉपी करून गौतमीने डोळ्यावर गॉगल लावून सुंदर अदा दाखवल्या आहेत. गौतमीचा हा FA9LA गाण्यावरचा व्हि़डिओ चाहत्यांनासुद्धा चांगलाच आवडला आहे.
गौतमीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. ‘मस्त हा मस्त’, ‘सबसे कातील गौतमी पाटील’, ‘हीच खरी हिरोईन’, ‘खूप छान’, ‘परफेक्ट’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच या व्हिडीओखाली हार्ट इमोजींचा पाऊस पडताना दिसत असून चाहत्यांनी गौतमी पाटीलच्या डान्सवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.
धुरंधर’ हा ॲक्शन चित्रपट आहे. ‘धुरंधर’ चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. ‘धुरंधर’ आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट आहे. ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’ चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. धुरंधर’ लवकरच 600 कोटींचा टप्पा गाठेल.