Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक जोशीचा स्क्रीनवर तगडा कमबॅक; ‘The Trap’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, अभिनेत्याचा लूक चर्चेत

मराठी अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अशातच या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज आहे. 'द ट्रॅप' असे या चित्रपटाचे नाव आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2026 | 10:29 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक जोशीचा स्क्रीनवर तगडा कमबॅक
  • ‘The Trap’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
  • अभिनेत्याचा दमदार लूक चर्चेत
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा हार्दिक जोशी आता पुन्हा एकदा वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

‘द ट्रॅप’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर हे केवळ एक दृश्य नसून, एका गूढ आणि अंधाऱ्या खेळाची झलक देणारा पहिला इशारा आहे. गडद सावल्या, शांत पण अस्वस्थ करणारी नजर आणि काहीतरी दडवलेले असल्याची जाणीव या सगळ्यांमुळे पोस्टर पाहताच एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘द ट्रॅप’ हे नाव जरी साधं वाटलं तरी त्यामागचा अर्थ खूप खोल आहे. एकदा या जाळ्यात अडकल्यावर सुटणं अशक्य, आणि प्रत्येक पात्र काही ना काही लपवतंय असा अंदाज या पोस्टरमधूनच प्रेक्षकांना येतो आहे.

‘आज मी अनाथ झालोय…’ Anurag Dobhal चा धक्कादायक खुलासा; ICU मधून बाहेर पडताच शेअर केली पोस्ट

नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये हार्दिक जोशीचा लूक अत्यंत गंभीर आणि रहस्यमय दिसतो आहे. बॅकग्राउंडमधील गडद रंगछटा आणि सस्पेन्सची झलक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार, याची खात्री वाटते.

या चित्रपटाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे नवोदित अभिनेता सुजित जाधव यांचे पदार्पण झाले आहे. पहिल्याच चित्रपटात हार्दिक जोशी यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पोस्टरमधील त्यांची झलकही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय चित्रपटात मोहन जोशी, संजय खापरे, श्याम मोहिते आणि स्वाती लिमये यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘The Trap’ या चित्रपटाची निर्मिती योगेश रामचंद्र जाधव यांनी केली आहे, तर कथा आणि दिग्दर्शन अमोल लक्ष्मण खापरे यांनी केली आहे. पटकथा, संवाद आणि गीते अभिजीत कोलेकर यांनी लिहिली असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन निरंजन पटकी यांनी सांभाळले आहे. संगीतकार नितीन उगलमुगले यांनी दिलेल्या पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा थरार अधिकच वाढणार आहे.

Chirayu 2026: मराठी कलाविश्वात ‘बीज गुढी’चा अनोखा संकल्प! शेलार मामा फाउंडेशनतर्फे पडद्यामागील कलाकारांचा गौरव

चित्रपटाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला की, “या चित्रपटातून मला एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आजवर अशा प्रकारचा सस्पेन्स थ्रिलर माझ्या वाट्याला आला नव्हता, त्यामुळे ही संधी मी पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न केला आहे.” एकूणच, ‘The Trap’ हा केवळ सस्पेन्स थ्रिलर नसून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा, विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत थरार कायम ठेवणारा चित्रपट ठरणार आहे. १० एप्रिल २०२६ पासून हा रहस्यांनी भरलेला खेळ उलगडणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन हा चित्रपट देत आहे.

Web Title: Hardik joshi the trap marathi movie poster release suspense thriller 10 april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
2

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
3

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज
4

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.