Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका

'सन मराठी'वर 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 19, 2025 | 04:27 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याचसह मालिकेत इतर उत्कृष्ट कलाकार दिसून येत आहेत. येत्या १ डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत हरीश दुधाडे अविनाश हे पात्र साकारत आहे. अविनाशचा स्वभाव हा हुकूमशाही प्रवृत्तीचा, स्वार्थी आणि प्रत्येक चुकीसाठी अनुप्रियाला जबाबदार धरणारा आहे.

अविनाशचा आपल्या कुटुंबाशी नक्की असा का वागत असावा? याबाबत अविनाशची बाजू काय असेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं’ या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे. प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते.

मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका हरीश दुधाडे साकारत आहे. अविनाश या भूमिकेविषयी सांगताना हरीश म्हणाला की, “आतापर्यंत मी अशी भूमिका साकारली नव्हती.  मला प्रेक्षकांनी नेहमीच सकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे. त्यामुळे प्रोमो पाहून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अविनाश बद्दल सांगायचं झालं तर तो नकारात्मक नाहीये. लहानपणापासून झालेले संस्कार, पुरुषप्रदान संस्कृतीला दिलेल महत्त्व यापुढेही परिस्थिती, डोक्यावर असलेलं कर्ज या सगळ्या गोष्टीने तो थोडा त्रासलेला आहे. म्हणूनच त्याचं वागणं इतरांना खटकतं पण तो त्याच्या कुटुंबावरही तितकंच प्रेम करतो.”

दोन मुलींची अविवाहित आई; १० वर्षे चित्रपटांपासून दूर, तरीही १०० कोटींची संपत्ती, OTTवर पुन्हा केली धडाकेबाज एंट्री

पुढे अभिनेता म्हणाला, ” प्रेक्षकांना माझ्या या भूमिकेचा नक्कीच राग येऊ शकतो आणि त्यासाठी मी तयार आहे. कारण तीच माझ्या कामाची पोचपावती असेल. कधी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय ही उत्सुकता लागली आहे. प्रोमो पाहून कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे. मी घरात कधीच कोणावर चिडत नाही. हसतं खेळतं वातावरण मला खूप आवडत. एकंदरीतच अविनाश आणि मी पूर्णपणे वेगळा असल्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. मालिकेतील माझे इतर सहकलाकार खूप भन्नाट आहेत. आम्ही सगळेचजण १ डिसेंबरची वाट पाहत आहोत. आतापर्यंत प्रेक्षकांनी प्रत्येक पात्राला खूप प्रेम दिलं यापुढेही हे प्रेम, आशीर्वाद कायम राहूदे.”

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधून समीर वानखेडेचा सीन आला हटवण्यात, दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश

Web Title: Harish dudhade to play the lead role in mee sansar majha rekhite premiering on sun marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

‘Avatar 3’ ने इतिहास रचला: देशभरात 1 बिलियन पार, ‘धुरंधर’ पेक्षा अधिक कमाई!
1

‘Avatar 3’ ने इतिहास रचला: देशभरात 1 बिलियन पार, ‘धुरंधर’ पेक्षा अधिक कमाई!

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री
2

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज
3

Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला
4

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.