Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फुलवंती’ चित्रपटातील शारदेची आराधना असणारं ‘हे शारदे’ हे ह्रदयस्पर्शी गाणं झाले लाँच!

‘फुलवंती’ या चित्रपटामधील अनेक गाणी लाँच झाली अजून, या चित्रपटामधील आणखी एक 'हे शारदे' हे ह्रदयस्पर्शी गाणं रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘फुलवंती’च्या मुख्यभूमीकेत प्राजक्ता माळी झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 10, 2024 | 03:11 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. नवरात्रीच्या या मंगलमय उत्सवात सर्वत्र आईचा जागर सुरु असतो. सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता आहे. शारदा हे सरस्वतीचे रूप आहे. ज्ञानाची अन् विद्येची देवता अशी ओळख असलेल्या तेजोमय रूपातील ‘शारदे’ची उपासना आगामी ‘फुलवंती’ या चित्रपटातील ‘हे शारदे’ या गाण्यातून पहायला मिळणार आहे. ‘फुलवंती’ या मराठी चित्रपटातील ‘हे शारदे’ हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे. जे नवरात्रीच्या काळात प्रेक्षकांना खूप आवडते आहे.

वाहतो ह्या इथे ज्ञानरुपी झरा
प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा
विद्या असे जिथे लक्ष्मी वसे तिथे
देसी तू जना अखंड सुखसंपदा

असे बोल असणारं हे गाणे मनाला प्रसन्नतेची आणि ऊर्जेची अनुभूती देते. मंदार चोळकर लिखित हे गाणं राहुल देशपांडे यांनी स्वरबद्ध केले आहे. संगीतकार अविनाश विश्वजीत यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.

देवीचे रूप भक्तांच्या मनामनात, अंतःकरणात कायम असते. तिच्याप्रती भावना गुंतलेल्या असतात. याच भावना ‘हे शारदे’ या गाण्याच्या वेळी आमच्या सर्वांच्या मनात होत्या, असं सांगत उर्जेची अनुभूती देणारा हे गाणं प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास ‘फुलवंती’ चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला. या गाण्याच्या निमित्ताने खूप वर्षांनी मराठी चित्रपटामध्ये देवी शारदेवर गाणं निर्माण झाले आहे.

शारदा अर्थात देवी सरस्वती ही विद्येची देवता आहे. ती बुद्धिमत्ता, वाणीवर प्रभुत्व, शहाणपण आणि तर्कशास्त्र प्रदान करते. ज्ञानाच्या- बुद्धीच्या सामर्थ्याने आपण जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत शारदेची उपासना महत्त्वाची मानली जाते. ‘फुलवंती’ चित्रपट नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानावर चित्रपट बेतला आहे. कला आणि बुद्धिमत्तेतील युद्ध या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटामधून पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. तसेच ‘फुलवंती’च्या मुख्य भूमिकेत देखील अभिनेत्री झळकणार आहे.

हे देखील वाचा- जुनैद आणि आमिर खानची KBC च्या मंचावर उपस्थिती, अमिताभ बच्चन यांनी दिला एक अनमोल सल्ला!

पॅनोरमा स्टुडिओज हा चित्रपट सादर करत आहेत. ‘फुलवंती’ हा मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित असून, ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तसेच, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन,मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Web Title: Hey sharde song from phulwanti movie was launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • entertainment
  • prajakta mali

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
2

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
4

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.