(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मोठमोठ्या मराठी कलाकारांची उपस्थिती लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे पार पडणार आहे. या सोहळा मराठी माणसांचा आणि त्यांच्या सन्मानाचा असणार आहे. तसेच या सोहळ्यात कोणकोणते मराठी कलाकार सामील होणार आहेत. तसेच कोणाला कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना देण्यात येणार असून, चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे.
‘हा तो चित्रपट नाही…’, रांझणाच्या AI क्लायमॅक्सवर संतापला धनुष; शेअर केली लांबलचक नोट
या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली आहे. सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय, ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या भव्यदिव्य सोहळ्याची रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, साहित्य संघ, दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे येथे निमंत्रण पत्रिका विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
‘कबुतर कुठल्या धर्माचा वाटत असेल तर…’, दादरच्या कबुतरखाना वादावर अभिजीत केळकरचा संताप
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील यांनी या सोहळ्याबद्दल स्वतःचे मत मानसताना म्हणाल्या, ‘गेली ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षणसोहळा अनोखा ठरणार आहे.’