
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.बिग बॉस 19 हा सीझन शेवटच्या टप्प्यात आला असून आता बिग बॉस मराठीची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
अख्खा महाराष्ट्र काय तर संपूर्ण जगभारत ज्याची चर्चा असते, ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघतो त्या पर्वाची चाहूल लागताच चर्चांना उधाण येतं आणि उत्सुकता शिगेला पोहचते. आता त्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार, एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच आपल्याला मिळणार आहेत.
यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. बिग बॉस मराठी 6 सीझनमध्ये पहिले नाव समोर आले आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बिग बॉस मराठी 6चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट करत यंदा घरात कोणते स्पर्धक दिसतील याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. या चर्चेत एका मराठी अभिनेत्रीचे नाव विशेष पुढे येताना दिसत आहे. चाहत्यांनी तिचे नाव घेत ती बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी होऊ शकते, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर अनेकांनी तिला थेट टॅग करत, या सीझनमध्ये तिला पाहण्याची इच्छा कमेंटमधून स्पष्टपणे व्यक्त केली आहे. प्रोमोने निर्माण केलेल्या या उत्सुकतेमुळे बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे.
Bigg Boss 19 : मालतीने तान्या मित्तलला मारली कानशिलात! म्हणाली – आणखी जोरात मारली…, पहा Video
ही अभिनेत्री म्हणजे सारिका साळुंखे. ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात सारिकाचं नाव टॅग केलं आहे. त्यामुळे ती या सीझनमध्ये दिसणार का, याबाबत आता प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सारिका ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून तिने विविध मालिकांमध्ये काम केले आहे. विशेषतः ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतल्या भूमिकेमुळे तिला चांगली ओळख मिळाली. याशिवाय काही वेब सीरीजमध्येही तिने काम केले आहे. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. सारिका सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. त्यामुळेच तिचं नाव बिग बॉस मराठीच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आल्याने चर्चा आणखी रंगू लागली आहे.
हेमा मालिनीला ना मिळणार संपत्ती, ना ही पेन्शन; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री इस्टेटमधून पडली बाहेर