
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कुनिका सदानंद आणि कुमार सानू यांचं अफेअर होतं. कुनिकाने स्वतः तिच्या अफेअरबद्दल सांगितलं होतं. तसेच बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींवर बलात्कार होत नाहीत, कारण अभिनेत्री स्वतः निर्माते-दिग्दर्शकाला तसे संकेत देतात. तिच्या या विधानांवरून तिच्यावर टीका होत आहे, याच दरम्यान कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने कुनिकाचा खरपूस समाचार घेतला आहे.
जान कुमार सानू यांची टिप्पणी
कुमार सानूचा मुलगा जान याने लिहिले आहे की, “तिने स्वतःच्या संपूर्ण करिअरमध्ये हेच केलंय, तेही विवाहित पुरुषांबरोबर. ज्यांना ती स्पर्श करू शकत होती, अशा सर्वांबरोबर. माझं तोंड उघडायला लावू नका, नाहीतर अनेक गुपितं उघड होतील.” हे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
कुनिका सदानंद काय म्हणाली?
एका मुलाखतीत कुनिका म्हणाली, “मला वाटतं की आपल्या चित्रपटसृष्टीत बलात्कार होत नाही, कारण मुलीकडून तसे संकेत मिळतात. समजा मी तुमच्याकडे कामासाठी आले आणि म्हणाले, ‘हॅलो सर, मला तुमच्याबरोबर काम करायचे आहे, जर चांगली भूमिका असेल तर मला सांगा’. ही एक सामान्य गोष्ट आहे.” आता काम मागण्याची दुसरी पद्धत काय आहे? याबद्दल कुनिका म्हणाली, “तेव्हा ती मुलगी विचित्र हावभाव करू लागते.”
कुनिका सदानंदने दावा केला की ती आणि कुमार सानू सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. कुमार सानू विवाहित असताना दोघांचं अफेअर होतं. तसेच एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली होती, परंतु तरीही कामासाठी कधीही तडजोड केली नाही, असंही कुनिकाने एका मुलाखतीत म्हटलं होतं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर लोकं प्रतिसाद देत आहेत.