Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रेक्षकांचं प्रेम पाहून आईने काय कमावलं याची प्रचिती…’, ज्योती चांदेकरांची लेक झाली भावुक; म्हणाली- ‘आई अचानक गेली’

'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. या दु:खद घटनेनंतर त्यांची मुलगी आता सोशल मीडियावर भावुक झाली आहे. आणि तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 21, 2025 | 10:53 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या काही दिवस आधी ज्योती यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महासंगम स्पेशल भागाचे शूटिंग पूर्ण केले होते.१० ऑगस्ट रोजी काही दिवसांची सुट्टी काढून त्या पुण्यात गेल्या आणि त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘पूर्णा आजी’ ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजीच्या पात्राविषयी प्रेक्षकांनी असंख्य कमेंट केल्या आहेत. मालिकेत त्यांची जागा इतर कोणत्याही अभिनेत्रीला देऊ नये, अशी मागणी प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली आहे.

पूर्णा आजीविषयी प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत असताना, त्यांची मुलगी पोर्णिमा पंडित हिने तिच्या आईला प्रेक्षकांकडून कायम मिळत आलेल्या या प्रेमाविषयी सगळ्यांचे आभार मानले आहे. आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्योती यांच्या निधनानंतर लेकीने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली. ज्योती चांदेकरांचा हसरा फोटो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट शेअर करत पोर्णिमाने ही पोस्ट लिहिली.

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

पोर्णिमाने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई). मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र-मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं, की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दीवाले आणि नाटक-सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ताच नसतो असं माझी आज्जी म्हणायची. तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही.’

 

पोर्णिमाने पुढे लिहिले की, ‘पण आई आता गेली, अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण.’

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘ठरलं तर मग’ मालिकेत ज्योती यांनी साकारलेल्या ‘पूर्णा आजी’च्या पात्राच्या जागी इतर कोणाला घेऊ नका अशी मागणी अजूनही प्रेक्षकांकडून होते आहे. याविषयी पोर्णिमाने लिहिले की, ‘अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली, असा कलाकार होणे नाही… अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं, किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली. आता पटतंय, कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर-पंडित, एक रंगकर्मी, कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली, रुबाबात राहिली, माणसं जोडली, नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या, आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे, मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार.’ असे लिहून पोर्णिमाने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

पोर्णिमाने शेअर केलेली ही पोस्ट तेजस्विनीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजीच्या पात्राविषयीची मागणी लक्षात घेता, प्रेक्षक एखाद्या पात्राशी किती जोडले जातात याचीच जाणीव होते. तसेच आता पोर्णिमानंतर प्रेक्षकांचे तेजस्विनीही काही प्रतिक्रिया देते का याकडे लक्ष वेधले आहे.

 

 

Web Title: Jyoti chandekar daughter and tejaswini pandit sister poornima shared emotional post after mother demise wrote about tharala tar mag purna aaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ
1

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
2

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
3

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
4

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.