
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच नवीन वर्षाला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाने मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव हा गंभीर विषय लोकांना विचार करायला भाग पाडेल आणि सोप्या पद्धतीत मांडला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट पेक्षा जास्त कमाई करून चित्रपटाचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि चित्रपगृहाबाहेर या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र होत आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शनातून बनवण्यात आला आहे. सगळ्याचे काम आणि चित्रपटामधील सगळी गाणी ही लोकांच्या मनाला भिडणारी आहेत. ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’ हा संदेश देत चित्रपटाने महत्वाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. चित्रपटाला आता प्रेक्षकांनी काय प्रतिसाद दिला आहे जाणून घेऊयात.
चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा आहे प्रतिसाद?
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडलेला दिसत आहे, दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे पहिले प्रेम ‘मराठी शाळा’ याबद्दल महत्वाचा संदेश दिला आहे. मराठी शाळा वाचवा तरचं मराठी भाषा जगेल असे वारंवार सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक चाहत्याने लिहिले ‘हा चित्रपट केवळ मराठी शाळेची कथा नाही तर आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘कमाल चित्रपट, शब्द कमी पडतील… एकदा नक्की पाहा.’ तसेच तिसऱ्या चाहत्याने देमंत ढोमेचे आभार मनात लिहिले, ‘खूप खूप धन्यवाद हा चित्रपट बनवण्यासाठी, आणि गंभीर विषय मांडण्यासाठी.’ असे लिहून अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई?
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शकाचे आणि संपूर्ण कलाकारांचे कौतुक देखील प्रेक्षक करताना दिसत आहेत. हा संपूर्ण चित्रपट २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यता आला आहे. परंतु या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जास्त कोटींचा गल्ला करून, आपले बजेट वसूल करण्याच्या मार्गावर आहे . टेनवोच्या वृत्तानुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १८ लाखांची कमाई केली आहे. आणि जगभरात या चित्रपटाने २० लाखांचा गल्ला जमवला आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी अभिनेत्री प्राजक्ता कोळी देखील दमदार भूमिकेत दिसली आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे.