अर्जुन बिजलानीवर दुःखाचा डोंगर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नक्की काय घडले?
वृत्तानुसार, अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी दुबईमध्ये होते. दरम्यान, नेहाचे वडील राकेश चंद्र स्वामी यांची तब्बेत बिघडली असून प्रकृतीची माहिती त्या दोघांना देण्यात आली. अर्जुनच्या सासऱ्यांना तातडीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आले आणि नेहाच्या वडिलांनी गुरुवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
३१ च्या रात्री जेवणाची तयारी करताना आला स्ट्रोक
समोर आलेल्या वृत्तानुसार, राकेश चंद्र नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी करत असताना त्यांना स्ट्रोक आला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अधिक ढासळतच गेली. त्वरीतच दुबईत असणाऱ्या नेहा आणि अर्जुन यांना याबाबत कळविण्यात आले होते. दरम्यान या घटनेने कुटुंब आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच या दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुनची मैत्रीण निया शर्मा देखील उपस्थित
अभिनेत्याच्या सासऱ्यांचे अंत्यसंस्कारमुंबईतच अंत्यसंस्कार झाल्याचे वृत्त आहे. अर्जुन यावेळी खूपच भावनिक झाला होता आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही होते. या दुःखाच्या क्षणी त्याच्यासोबत अनेक इंडस्ट्रीतील स्टार्स साथ द्यायला आल्याचे दिसून आले. अर्जुनची मैत्रीण निया शर्मा देखील त्याच्या दुःखात सहभागी झाली होती. दरम्यान अनेक कलाकार त्याला पाठिंबा द्यायला उपस्थित होते.
अर्जुनचेही सासऱ्यांवर विशेष प्रेम
अर्जुनचे त्याच्या सासऱ्यांशी खूप चांगले नाते होते. असे म्हटले जाते की अर्जुनच्या वडिलांचे तो लहान असताना निधन झाले असल्याने, राकेश चंद्र स्वामी केवळ सासरेच नव्हते तर त्याला आपल्या वडिलांच्या ठिकाणी होते. नेहाचे वडील अर्जुनच्याही अधिक जवळ होते. अर्जुनचे त्यांच्यावर खूप प्रेम होते आणि तो नेहमीच त्यांचा आदर करत असे. काही रियालिटी शो मध्ये त्याच्या सासऱ्यांंनी उपस्थितीदेखील लावली होती.
अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर






