(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये लक्ष्मीच्या ६० व्या वाढदिवसाचा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लक्ष्मीला वाटतं की घरात कुणालाही तिचा वाढदिवस लक्षात नाही. मात्र श्रीनिवास तिला खास सरप्राईज देणार आहे.
लक्ष्मीनिवास मध्ये लक्ष्मीच्या वाढदिवसाची तयारी सुरू झालेय. त्याचवेळी जयंत फोन करून आपल्या घरी पार्टी ठेवण्याचा आग्रह धरतो, पण भावना आधीच सगळं ठरलं असल्याचं सांगते.
भावनाच्या घरी बॉलीवूड थीमवर भव्य सरप्राईज पार्टी आयोजित केली जाते. सगळे जण बॉलीवूड थीमवर पार्टीत सहभागी होतात. गाणी, नृत्य आणि धमाल सुरू होते. संपूर्ण कुटुंब एकत्र पाहून लक्ष्मी भावूक होते.
आणि त्यानंतर तिला जान्हवीची आठवण येते. तिला हे माहीत नाही की जान्हवी पार्टीत उपस्थित आहे. आनंदाच्या या क्षणांमध्ये अचानक पोलिस पार्टीत दाखल होतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो.
आता पोलिस नेमके का आले आहेत? या आनंद प्रसंगी कोणतं नवं संकट उभं राहणार आहे? जान्हवी सगळ्यांच्या नजरेस पडणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मीनिवासच्या येणाऱ्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.