
Punha Shivajiraje Bhosle चित्रपटाची 5 दिवसांची कमाई फक्त 'इतकीच'
31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटासंबंधी अनेक रोचक माहिती दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी सुरुवातीला सुमारे साडेसात ते आठ कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले होते. मात्र, निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान खर्च वाढत गेला आणि शेवटी या चित्रपटाचा खर्च तब्बल 13 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 13 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला असल्या कारणाने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवले याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 19 लाख रुपयांची कमाई केली होती. पहिला दिवस साधारण राहिला असला तरी व्हीकेंडच्या काळात चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ दिसून आली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 52 लाख रुपयांचा गल्ला जमवला, तर रविवारी 46 लाख रुपयांची कमाई झाली. मात्र, सोमवारच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असून, त्या दिवशी फक्त 10 लाख रुपयांचा व्यवसाय झाला. एकूण चार दिवसांत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे.