Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

‘तिघी’ हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये आई आणि मुलींच्या नात्याचे गोड बंधन पाहायला मिळाले आहे. तसेच हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम
  • ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाणं रिलीज
  • आई आणि मुलींचे दिसणार गोड नातं
 

आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास या गाण्यात मांडण्यात आले आहेत.

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणाल्या, ” ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

‘शतक’ चित्रपटातून RSS च्या शताब्दीचा गौरव; चित्रपटाबद्दल बाबा रामदेव यांचा भावपूर्ण संदेश

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

Web Title: Tighi marathi movie haas jarashi song celebrates mother daughter bond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.