(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी कलाकार अनेकवेळा सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर स्वतःचे मत मांडताना दिसत असतात. त्यापैकी एक कलाकार म्हणजे मराठी अभिनेता अभिजीत केळकर आहे. अभिजीत सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो आणि सामाजिक, राजकीय घटना-घडामोडींवर मत व्यक्त करताना दिसत असतो. अशातच आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दादर येथील कबुतर खान्याचा परिसर दिसतो आहे. सध्या दादर येथील कबुतर खान्यावरून खूप वाद सुरु आहे.
जैन समाज आक्रमक झाला आहे
नुकतेच दादारचा कबुतरखान्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही लोकांनी पालिकेच्या या निर्णयावर विरोध केला. दरम्यान याच मुद्द्यावरून आता जैन समाज आक्रमक झालेला दिसतो आहे. तसेच याप्रकरणी अभिनेता अभिजीत केळकरने व्हिडिओ शेअर लोकांना महत्वाचा संदेश दिला आहे. तसेच यावर अभिनेता नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.
‘फक्त शिक्षणच तोडू शकेल हुकूमशाहीच्या साखळ्या…’, कमल हासनने केंद्र सरकारवर साधला निशाणा
अभिजीत केळकरने शेअर केली पोस्ट
अभिजीत केळकरने या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा…आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता, @my_bmc @mybmchealth ने जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे त्यामागे खंबीरपणे उभे रहावे ही कळकळीची विनंती … Proud of you @my_bmc’ असं म्हणत जनतेनं बीएमसीच्या कारवाईचा आदर करावा अशी विनंती केली आहे.
‘हा तो चित्रपट नाही…’, रांझणाच्या AI क्लायमॅक्सवर संतापला धनुष; शेअर केली लांबलचक नोट
दरम्यान, अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘मी सुद्धा हे लहानपणापासून पाहिलं आहे, ही कबुतरं किती घाण करतात हे तेव्हाही आम्ही म्हणायचो, पण काही कारणांनी का होईना ह्याची आता उचलबांगडी होणार’ असे नेटकऱ्याने लिहिले आहे. त्याचबरोबर दुसऱ्याने लिहिले की, ‘True.This is a major issue. कबुतरांच्या या समस्येचा आम्ही अनेक वेळा सामना केला आहे.’ असे लिहून अनेक लोकांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे.