
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. उत्तम अभिनय, सोबतीला अनेक दर्जेदार फोटो शूट आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून अक्षया कायम चर्चेत असलेली बघायला मिळाली आहे. नुकतंच अक्षयाच दमदार ओटीटीवर पदार्पण झालं असून टेलिव्हिजन पासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यू पर्यंत येऊन पोहचला आहे.
नेटफ्लिक्स वर नुकताच आलेला “ग्रेटर कलेश” या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधी देखील ठरली आहे. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाच उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे. तिचा अभिनय आणि चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
911 Nashville फेम अभिनेत्रीचे वयाच्या २३ व्या वर्षी निधन, १० वर्षांपासून ‘या’ आजाराशी सुरु होती झुंज
अक्षयाने या चित्रपटात “पंखुरी” हे पात्र साकारल असून ग्रेटर कलेश हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होताना दिसतो आहे. कोणत्याही कलाकाराची बॉलीवूड मध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा ही असतेच आणि या निमित्तानं अक्षया या खास प्रोजेक्ट चा भाग झाली आणि तिचं बॉलीवूड पदार्पण सुपरहीट ठरलं आहे.
पहिल्या वहिल्या ओटीटी डेब्यू बद्दल बोलताना अक्षया म्हणाली, “नेहमी एक पाऊल पुढे टाकायची इच्छा असते आणि माझ्यासाठी कुठलंच काम छोटं नसतं पण नेहमी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्याने हा प्रोजेक्ट करण्याची मला संधी आली असं मला वाटतं. कुठल्याही कलाकारासाठी नेटफ्लिक्स हा प्लेटफॉर्म हे खूप मोठा आहे हे कायम वाटत आणि माझा पहिला बॉलीवूड फिल्म डेब्यू इकडे होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट करायला मिळणं ही संधी खूप खास होती याचा तर आनंद आहे आणि अर्थातच आमची फिल्म सध्या no. १ वर ट्रेंड करत असल्यामुळे स्वतःलाच एक मस्त दिवाळी गिफ्ट मिळालं याचा आनंद वाटतोय.’
Bigg Boss 19: ‘माझ्यासोबत पंगा घेऊन तर बघ…,’ तान्यावर भडकला अमाल; दोघांच्या मैत्रीत दुरावा
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझी भूमिका जरी छोटी असली तरी ती खूप महत्वपूर्ण आहे याचं संपूर्ण श्रेय मी आमचे दिग्दर्शक आदित्य Chandiok आणि लेखक रितू मागो यांना देईन. एका टिपिकल मराठी मुलीकडून त्यांनी एक टिपिकल दिल्ली गर्ल साकारून घेतली आहे. एहसास चन्नाच्या सोबत सगळेच इतर कलाकार खूप सुंदर काम करतात, आणि मुळात माणूस म्हणून देखील सगळे छान होते. चांगल्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना जेव्हा चांगली माणसं भेटतात तेव्हा त्या प्रोजेक्ट च्या यशाचा आनंद हा शब्दात मांडता येत नाही“