(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“911 नॅशव्हिल” या लोकप्रिय वेब सिरीजमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री इसाबेल टेटचे निधन झाले आहे. वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांना तिच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. इतक्या लहान वयात तिचे निधन होणे खूपच धक्कादायक आहे. २०२२ मध्ये तिने स्वतः खुलासा केला होता की ती वयाच्या १३ व्या वर्षापासून गंभीर आजाराशी झुंजत होती. तिच्या कुटुंबाने तिच्या निधनाची घोषणा केली आहे. तिच्या पहिल्या वेब सिरीजने प्रसिद्धी मिळवणाऱ्या इसाबेलने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरवली आहे.
‘जे लोक तुम्हाला ओळखतात…’, युजवेंद्र चहलच्या बहिणीने धनश्री वर्मावर केली टीका, शेअर केली पोस्ट
कुटुंबाने दिली माहिती
इसाबेल टेटच्या कुटुंबाने तिच्या निधनाबद्दल एक निवेदन शेअर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की इसाबेलचे रविवारी निधन झाले आणि या बातमीने तिच्या कुटुंबावर प्रचंड दुःख ओढवले आहे. इतक्या लहान वयात मुलीच्या निधनाने तिचे पालकही हताश झाले आहेत. इसाबेलच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या कुटुंबात तिची आई कतरिना काझाकोस टेट, वडील जॉन डॅनियल टेट, बहीण डॅनिएला टेट आणि सावत्र वडील विष्णू जयमोहन यांचा समावेश आहे.
इसाबेल टेटची कारकीर्द
टेनेसीच्या नॅशव्हिल येथे जन्मलेली इसाबेल टेट पदवीधर झाल्यानंतर लगेचच या इंडस्ट्रीत सामील झाली. लहान वयातच तिला “911: नॅशव्हिल” या लोकप्रिय हॉलिवूड मालिकेत भूमिका करण्याची ऑफर मिळाली. या मालिकेद्वारे इसाबेलने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. “911: नॅशव्हिल” मधील अभिनेत्रीची “ज्युली” ही भूमिका चांगलीच गाजली. अभिनेत्रीच्या कुटुंबाने सांगितले की इसाबेलला अभिनय जगात खूप काही साध्य करायचे होते. तिला तिच्या कामावर खूप प्रेम होते. इसाबेलला प्राण्यांवरही प्रेम होते. परंतु अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
Bigg Boss 19: ‘माझ्यासोबत पंगा घेऊन तर बघ…,’ तान्यावर भडकला अमाल; दोघांच्या मैत्रीत दुरावा
अभिनेत्री कोणत्या आजाराने होती ग्रस्त?
२०२२ मध्ये, इसाबेलने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने खुलासा केला की ती १३ वर्षांच्या वयापासूनच न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होती. या आजारामुळे तिच्या पायांचे स्नायू कमकुवत झाले होते. या आजाराशी लढताना, अभिनेत्रीने कधीही स्वतःला कमकुवत दाखवले नाही. आता अभिनेत्रीच्या जाण्याने चाहते दुःखी झाले आहेत.






