
सहकुटुंब सहपरिवार मधून अंजी या व्यक्तीरेखेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कोमल कुंभार हिचा ऑफ कॅमेरा संघर्ष भयाण होता. कोमल आणि तिचा पती गोकुळ दशवंत यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली त्यावेळी कोमले तिच्या संघर्षाबाबत सांगितलं.
कोमल सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंबातील. त्यामुळे घरच्य़ांकडून तिला मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती. कोमल म्हणाली की, जेव्हा सहकुटुंब सहपरिवार मालिकेचा प्रोमो शुट करायचा होता तेव्हा तिला मुंबईला यावं लागणार होतं. कोमलने जेव्हा मुंबईला जायचंयं हे तिच्या घरी सांगितलं तेव्हा तिच्या आई वडीलांनी तिला कडाडून विरोध केला. तिची समजूत काढण्यासाठी आईने तिच्या मामाला देखील बोलावलं. पण कोमल तिच्या निर्णयावर ठाम होती. जेव्हा कोमल मुंबईला जायचच आहे हे कळकळून सांगत होती तेव्हा तिच्या आईला संशय आला. कोमवला तिच्या आईने विचारलं की, तुझं कोणावर प्रेम आहे का ? त्यावर कोंमलने आईला सगळं सांगितलं. कोमल पुढे असंही म्हणाली की त्यावेळी ते सांगणं योग्य होत की नव्हतं, मला माहित नाही पण मी जे आहे ते खरं सांगितलं असं ती म्हणाली.
त्यावेळी सगळं कुटुंब एकीकडे आणि मी एकीकडे होती. पण मी हार मानली नाही. मला असं वाटतं की प्रेम काय करतं तर तुम्हाला खरं सांगण्याची धमक देतं. त्यावेळी ठणकावून सांगणं मला जमलं कारण ती हिंमत प्रेमातून आलेली होती. घरी मला वडीलांनी रागाच्या भरात पाईपने मारलं खूप मारझोड केली. अंगावर वळ उमटले होते पण मी माझ्या निर्णयावर ठाम होती. सामान्य कुटुंबातील मुलगी ते सेलिब्रिटी होण्यापर्यंतच आयुष्य खूप काही शिकवणारं होतं असं कोमल म्हणाली.
कोमलच्या प्रंटवर्कबाबत सांगायचं तर, सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून तीने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अबोली मालिकेतही ती झळकली. कोमलने 2025 मध्ये दिग्दर्शक गोकुळ दशवंत याच्याशी लग्नगाठ बांधली.