Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ याने सन्मानित करण्यात आले.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा
  • ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव
  • इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
 

मराठी इंडी संगीत क्षेत्राच्या वाढत्या प्रभावाचा उत्सव ठरलेला ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’ हा भव्य सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, तसेच प्रियांका बर्वे, सावनी रवींद्र, कार्तिकी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे.

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडून स्वतःच्या बळावर संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य संधी आणि ओळख मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले. गायक, संगीतकार, गीतकार, वादक आणि तांत्रिक क्षेत्रातील कलाकारांचा गौरव करत इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बासरीवादक अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला.

याशिवाय, अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून गौरविण्यात आले, तर ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला. विशेष कामगिरीसाठी आकाश देशमुख यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ आणि परदेशात मराठी संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या व्ही. रमेश यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

भारत माता चित्रपटगृहात ‘सुपर डुपर’चा भव्य प्रीमियर; 6 वर्षांनंतर थिएटरचा दिमाखदार पुनरागमन सोहळा

या सोहळ्याबाबत आयोजक अजय नाईक यांनी सांगितले की, ‘मिमा’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून मराठी इंडी संगीताच्या वाढत्या सामर्थ्याचा उत्सव आहे. कलाकारांना योग्य व्यासपीठ, ओळख आणि उद्योगाशी जोडण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, भविष्यात मराठी इंडी संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. एकंदरीत, ‘मिमा २०२६’ने मराठी इंडी संगीताला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि व्यापक व्यासपीठ मिळवून दिले असून, या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Web Title: Marathi indie music awards mima 2026 ajit kadkade guru thakur bela shende awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kitchen Tips : गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवलं तर काय होतं? ‘या’ गैरसमजामागचं सत्य जाणून घ्या
1

Kitchen Tips : गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवलं तर काय होतं? ‘या’ गैरसमजामागचं सत्य जाणून घ्या

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला
2

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ
3

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money  च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क
4

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.