
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारं ‘एकदा पाहावं करून’ नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नाकात हाऊसफुल होत असताना आता आणखी एका नवीन नाटक प्रेक्षकांना नवा आनंद देणार आहे.
Border 2: दिलजीत दोसांझचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज ; पायलट, जेट आणि युद्धाचा थरकाप अनुभव!
‘एकदा पाहावं करून’ या नाटकाची कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत आणि ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाका. हे सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांचे अभिनयकौशल्य दिसून येणार आहे. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे आणि वैभव मांगले असे ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे संपूर्ण नाटक रंगभूमीवर नक्कीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.
भारतीय चित्रपटांचा गेमचेंजर; ‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार भूमिका
नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभवता येणार आहे. रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित आणि रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे आणि अजय विचारे हे आहेत. हास्याचे वादळ घेऊन येणारे ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचा शुभारंभ ६ डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे होणार आहे.