Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश देशमुख आणि तौफिक कुरेशींच्या उपस्थितीत रंगणार ‘छोटे उस्ताद ४’ चा महाअंतिम सोहळा; २ आणि ३ मे रोजी होणार फैसला!

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४' चा विजेता कोण? २ आणि ३ मे रोजी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात रितेश देशमुख आणि तौफिक कुरेशी लावणार हजेरी. ६ फायनलिस्टमध्ये रंगणार चुरस.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 08:00 PM
रितेश देशमुख आणि तौफिक कुरेशींच्या उपस्थितीत रंगणार ‘छोटे उस्ताद ४’ चा महाअंतिम सोहळा; २ आणि ३ मे रोजी होणार फैसला!
Follow Us
Follow Us:

 

  • रितेश देशमुख आणि तौफिक कुरेशींच्या उपस्थितीत रंगणार ‘छोटे उस्ताद ४’ चा महाअंतिम सोहळा
  • २ आणि ३ मे रोजी होणार फैसला!
Mi Honar Superstar Chhote Ustad 4 Grand Finale: स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच २ आणि ३ मेला रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. या महाअंतिम सोहळ्याचं खास आकर्षणं ठरणार आहेत जगविख्यात तालवादक तौफिक कुरेशी आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती.

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण

तौफिक कुरेशी यांनी आपल्या अद्वितीय तालवादनाने छोटे उस्तादचा मंच मंत्रमुग्ध करुन टाकला आहे. खास करुन आदर्श शिंदे आणि तौफिक कुरेशी यांच्यामधील जुगलबंदी लक्षवेधी ठरणार आहे. यानिमित्ताने एक जागतिक दर्जाचा सांगितीक अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. दुसरीकडे, रितेश देशमुखने स्पर्धकांना खास भेट देत त्यांचं कौतुक केलं आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे महाअंतिम सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे.

या दैदिप्यमान सोहळ्यात कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची विरा हाक्के, नाशिकची अस्मिता गादेकर, पुण्याचा गंधर्व चामनर आणि ईशानी हिंगे या सहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ चा महाअंतिम सोहळा येत्या २ आणि ३ मेला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण

Web Title: Me honar superstar chote ustad 4 grand finale date time finalists list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Entertainment News
  • ritesh deshmukh
  • star pravah

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.