(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटाला आता प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे हे पाहून आनंद होत आहे. ‘दशावतार’ चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे आणि प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित या चित्रपटचं प्रेक्षकांकडून, समीक्षकांकडून कौतुक होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी हा चित्रपट पहिला आहे, आणि स्टारकास्टचे कौतुक केले आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी
‘दशावतार’ चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत असताना. राज ठाकरे यांनी देखील नुकताच हा चित्रपट पहिला. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी व्हिडीओमध्ये म्हटले की, “या सिनेमातून एका गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. अनेक वर्षे मी माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो आहे की, आपल्या जमिनी वाचवा. कारण जमीनच तुमचं अस्तित्व आहे.” असे राज ठाकरे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
दिग्दर्शक सुबोध खानोलकरचे केलं कौतुक
राज ठाकरे पुढे म्हणाले, “खरंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. फक्त एकट्या कोकणातच ही गोष्ट आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्रातल्या अनेक जमिनींचा विषय सुबोध खानोलकर यांनी अत्यंत चालाखीने हा विषय सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे. दशावतारच्या सर्व रुपातून त्यांनी ही कथा आणली आहे. मी काय सिनेमाची कथा सांगत नाहीय. पण एक उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध असला तरी संपूर्ण महाराष्ट्राने यातून बोध घ्यावा असा हा सिनेमा आहे.”
६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी नोंदवला राज कुंद्राचा जबाब, लवकरच करणार कारवाई
सिनेमातील कलाकारांचं राज ठाकरेंकडून कौतुक
राज ठाकरे यांनी सिनेमातील कलाकारांचं कौतुक करत म्हणाले की, “दिलीप प्रभावळकरांनी उत्तम काम केलं आहे हे अत्यंत थोटं वाक्य आहे. कारण ते खूप मोठे आहेत. कमाल केली आहे त्यांनी. महेश मांजरेकरने उत्तम काम केलं आहे. साजेसं काम केलं आहे. प्रियदर्शिनी त्यांनीही सुंदर, चांगलं काम केलं आहे.” राज ठाकरे म्हणाले, “या सिनेमात एंटरटेनमेंट आहेच पण म्हणून हा सिनेमा न पाहता त्यात महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या सिनेमाने हात घातला आहे. त्यासाठी हा सिनेमा महाराष्ट्राने नक्की पाहिला पाहिजे.”
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दशावतार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले आहेत. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. सिनेमाची ऐकूण कमाई आता ४.३७ कोटी रुपये इतकी झाली आहे. तसेच ‘दशावतार’ हा चित्रपट एक सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे.