(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
“खाशाबा” हा मराठी चित्रपट खाशाबा दादासाहेब जाधव यांची प्रेरणादायी कथा मांडणारा आहे. एक अग्रगण्य फ्री स्टाईल कुस्तीपटू, ज्यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये रिंग आणि सामाजिक अपेक्षा या दोन्हीशी झुंज देत स्वतंत्र भारताचा पहिला वैयक्तिक पदक विजेता होण्यासाठी विजय मिळवला यांच्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपट निर्माता नागराज मंजुळे यांनी केले आहे.
मराठी चित्रपसृष्टीतील यासोबतच बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. मात्र हा चित्रपट आता वादात अडकला असून पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवल्याची बातमी समोर आली आहे. या चित्रपटबाबत कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे समन्स बजवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबाबत संपूर्ण प्रकरण.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?
मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा खाशाबा सिनेमाची कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची मूळ कथा ही लेखक संजय दुधाणे यांनी लिहिल्याचे समोर आले होते. याच संदर्भात दुधाणे यांनी कोर्टात धाव घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला आहे. संजय दुधाणे यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळेसह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. याच चित्रपटाच्या प्रकरणी कोर्टाने नागराज मंजुळे यांना समन्स पाठवला आहे.
मोहिनी डे एआर रहमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली स्पष्ट, सोशल मीडियावरील पोस्टने वेधले लक्ष!
मिळालेल्या माहितीनुसार, खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून लेखक संजय दुधाणे यांच्याकडे आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर भारत सरकारकडचे कॉपी राइट कार्यालयाकडून मिळालेले प्रमाणपत्रही त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच प्रकरणी आता चित्रपटाचे प्रदर्शन थांबण्यासाठी रविंद्र शिंदे आणि अॅड. सुवर्णा शिंदे यांच्या मार्फत पुण जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आता नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी कोर्टाने समन्स पाठवले आहेत.