(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सामंथा रुथ प्रभू अलीकडेच तिच्या सिटाडेल: हनी बनी या मालिकेसाठी चर्चेत होती. या मालिकेत तिच्यासोबत बॉलीवूड स्टार वरुण धवन दिसला होता. याशिवाय सामंथा चर्चेत राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिचे नागा चैतन्यसोबत घटस्फोटाचे प्रकरण. नागा चैतन्यने २०२१ मध्ये अभिनेत्री सामंथाला घटस्फोट दिला आणि आता तो लवकरच शोभिता धुलीपालाशी लग्न करणार आहे. यानंतर समांथाला तिच्या या निर्णयामुळे खूप ट्रोल केले जात होते. मात्र, त्यावेळी अभिनेत्रीने या प्रकरणी मौन बाळगले होते. आजपर्यंत त्यांच्या घटस्फोटाचे कारण कोणालाच कळू शकलेले नाही.
महिलांना जज केले जाते – सामंथा
Galata India ला दिलेल्या मुलाखतीत, समंथा यांनी महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक आव्हानांवर भाष्य केले आणि पितृसत्ता सारख्या विषयांवर अभिनेत्री आपले मत मांडताना दिसली. अभिनेत्री म्हणाली, “दुर्दैवाने, आपण एवढ्या पितृसत्ताक समाजात राहतो की जेव्हा जेव्हा एखादी चूक होते तेव्हा स्त्रीला त्रासाला सामोरे जावे लागते… मी असे म्हणत नाही की पुरुषांसोबत असे घडत नाही. पण हे स्त्रीच्या बाबतीत जास्त घडते. हे अत्यंत लज्जास्पद आहे.” असे अभिनेगतरी म्हणाली.
मल्लिका शेरावतने फ्रेंच बॉयफ्रेंड सिरिल ऑक्सेनफॅन्ससोबत केला ब्रेकअप, म्हणाली- ‘खूप कठीण आहे…’!
सामंथाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला
सामंथा पुढे म्हणाली की, घटस्फोटाच्या वेळीही तिच्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या होत्या, त्यामुळे तिला ऑनलाइन अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. अभिनेत्री म्हणाली की तिने अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण नंतर गप्प राहणेच बरे वाटले. सामंथा म्हणाली की तिने या खोट्या गोष्टींना तिच्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही.
अभिनेत्री म्हणाली की, ‘माझ्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी बोलल्या गेल्या. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. जेव्हा परिस्थिती खूप वाईट होती आणि सर्वत्र खोटे पसरवले जात होते, तेव्हा मी स्वतःशी बोलायचे. बरेचदा असे घडले की मला सत्य उघड करायचे आहे आणि हे सर्व चुकीचे आहे असे म्हणायचे आहे. मग मला वाटले की माझे कुटुंब, माझ्या मित्रांना माझे सत्य माहित आहे आणि ते पुरेसे आहे. मला स्वतःला सर्वांसमोर सिद्ध करण्याची गरज नाही.” असे अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितले.
समंथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यला शोभितासोबत अनेकदा स्पॉट केले गेले. दोन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी ८ ऑगस्टला एंगेजमेंट केली. आणि आता हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या दोघांचा लग्न सोहळा पार पडणार आहे.