Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफिसवर “नवरा माझा नवसाचा २” ची ट्रेन सुसाट, वीकेंडला ७.८४ कोटीची कमाई!

बहुचर्चित मराठी चित्रपट "नवरा माझा नवसाचा २" सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. तसेच हा चित्रपट नुकताच २० सेप्टेंबर चित्रपटगृहात दाखल झाला अजून या चित्रपटाला फक्त दोन दिवसातच चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 23, 2024 | 11:05 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

तब्बल एकोणीस वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा भाग दोन चित्रपटगृहात दाखल झाल्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या पैकी कित्येक जणांचे बालपण नवरा माझा नवसाच्या या चित्रपटामुळे यादगार झाले आहे. या चित्रपटही एक एक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एवढेच नाही तर सिनेमाची गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच जेव्हा या सिनेमाच्या भाग दोनची घोषणा झाली तेव्हा अनेक जणांनी या निर्णयाचे स्वागत केले.

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल झाले होते. वीकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले आहे.

चित्रपटामधील सुपरहिट स्टारकास्ट
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांनी केले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह या चित्रपटामध्ये मोठी स्टारकास्ट देखील पाहायला मिळणार आहेत. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉस १८ चा नवा प्रोमो प्रदर्शित! दाखवणार स्पर्धकांचं भविष्य

सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट चर्चेत राहिला आणि याचेच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिले आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंकाच नाही.

 

Web Title: Navara maza navasacha 2 is creating havoc on box office earned 7 84 crores in the weekend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • entertainment
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.