
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकप्रिय इन्फ्लुएन्सर नील साळेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या कल्पना, क्रिएटिव्ह एडिट्स आणि हटके व्हिडिओमुळे नीलने सोशल प्लॅटफॉर्मवर खास स्थान निर्माण केले आहे.
नीलची क्रिएटिव्हिटी केवळ सामान्य प्रेक्षकांनाच नाही तर अनेक सेलिब्रिटींनाही भुरळ घालत आहे. खास म्हणजे भारतीय क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकरही नीलच्या कामाचा मोठा चाहते असल्याचे विविध पोस्ट्स आणि इंटरअॅक्शनमधून दिसून आले आहे. सचिनने नीलची काही क्रिएटिव्ह कामं शेअर करून त्याचं कौतुकही केलं आहे.
नील साळेकरचे व्हिडिओ, रील्स आणि कलात्मक कॉन्सेप्ट आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याच्या कंटेंटमध्ये असलेली मौलिकता, कौशल्यपूर्ण एडिटिंग आणि नवनवीन प्रयोग करण्याची तयारी यामुळे त्याचा फॅनबेस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कळव्यातून थेट सोशल मीडियाच्या दुनियेपर्यंतचा नीलचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी वेळात मोठं नाव कमावणारा नील साळेकर आज डिजिटल जगतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या इन्फ्लुएन्सर्सपैकी एक बनला आहे.
नील साळेकर आणि त्याची पत्नी श्रिया पुसळकर हे दोघे तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. आता नीलच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघंही समुद्राच्या लाटांमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. आणि त्याच्या दोघांच्या पायांच्या मध्ये छोट्या बाळाच्या पायांचे ठस्से दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शन मध्ये एक सुर्यफल, बेबी बम्प आणि एक रेड हार्ट ठाकले आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्या दोघांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. तर एकाने लिहिले आहे, ”कोणीतरी येणार, खूपसारा आनंद घेऊन येणार..” दुसऱ्या कमेंट्स मध्ये लिहिले, मी मावशी की आत्या?, अश्या अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्ट आल्या आहेत.