(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहची प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील मालिकेला रामराम केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील मुख्य नायिका ईशा केसकर आहे. ईशा मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तसेच या बातमीमुळे चाहते नाराज झाले आहेत. आता या मगच कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या मोठे धक्कादायक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेची मुख्य नायिका ईशा केसकर हिने मालिका सोडल्यामुळे चाहते दुखावले आहेत. मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची नवीन नायिका म्हणून एण्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने ईशा ने मालिका सोडली अशी चर्चा सुरू असताना मालिका सोडण्याचे खरे कारण काय हे अभिनेत्रीने सांगितले आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कला या व्यक्तिरेखेचा अपघात झाल्यानंतर ती हे जग सोडून गेल्याचे उपकथानकात दाखवले गेल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत नव्या अध्यायाचीही सुरूवात झाली आहे. मालिकेत सुकन्या या नवीन नायिकेचे आगमन झाले आहे.
नुकताच एका मुलाखतीत ईशा केसकरने मालिका का सोडली यावर सविस्तर भाष्य केले आहे.ईशाने सांगितले की, ”मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशीच शूटिंग करत राहिले. पण ती दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मी विश्रांती घेतली नाही, तर भविष्यात डोळ्याची एक छोटीसी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी 15-20 दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही,” असे तिने सांगितले. त्यावेळी सारासार विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं’, असं ईशा म्हणाली.
Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट
काही महिन्यांपूर्वी सुद्धा ईशा मालिकेच्या काही भागांमध्ये दिसली नव्हती. तेव्हा तिची प्रकृती ठिक नसल्याने तिने सुट्टी घेतली होती. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मध्यंतरी मला चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा झाली होती, त्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते. त्या वेळी मालिकेच्या टीमनं माझी खूप काळजी घेतली. पण आता डोळ्याला दुखापत झाली म्हणून पुन्हा सुट्टी मागणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे मालिकेच्या कथेलाही अडथळा आला असता. म्हणून मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला,” ती म्हणाली.
पलाशने स्मृती आधीही Ex‐Girlfriend ला गुडग्यावर बसून केलं आहे प्रपोज, व्हायरल होतोय ७ वर्ष जुना फोटो
तिने पुढे सांगितले,“आपण मेहनत करून पैसे कमावतो, पण त्याचा आनंदच घेता आला नाही तर त्याचा काय उपयोग? म्हणून मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्रांती घेतल्यानंतर मी पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.”






