
फोटो सौजन्य: YouTube
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठी सिनेमा जगताचे दिग्गज आणि अत्यंत कुशल कलाकार एकत्र आले आहेत. टिझरमध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे, ज्यांनी चित्रपटाच्या टिझरमध्ये आपली चमक दाखवली आहे.
‘Coolie’ की ‘War 2’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण आहे पुढे? १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर
टीझरच्या सुरवातीलाच महेश मांजरेकर यांच्या आवाजातील गाऱ्हाणं प्रेक्षाकांना ऐकायला मिळत आहे. या टीझरमध्ये काही गूढ प्रसंग देखील पाहायला मिळत आहे. यावरून या सिनेमात प्रेक्षकांना काय अनुभवायला मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. काहींनी तर याला मराठी चित्रपटसृष्टीतील कांतारा असे म्हंटले आहे.